आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:चोरीच्या चार दुचाकी जप्त, चोरटा गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला अटक केली. नितीन ऊर्फ गोलु गोवर्धन मोरकार (३०, रा. वडनेर गंगाई) असे चोरट्याचे नाव असून, त्याच्या ताब्यातून १ लाख ६० हजार रुपये किमंतीच्या चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या. पुढील कारवाईसाठी त्याला दर्यापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ग्रामिण भागातील दुचाकी चोरीच्या घटना पाहता पोलिस अधिक्षकांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने पोलिसांनी गुप्त माहितीवरून चोरीची दुचाकी बाळगणाऱ्या नितीन मोरकारला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने दर्यापूर, अंजनगाव व अकोट येथून दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. या माहितीवरून पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चार दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई एलसीबीचे पीआय तपन कोल्हे, पीएसआय सुरज सुसतकर, सुनिल महात्मे, सै. अजमत, उमेश वाकपांजर, नीलेश डांगोर, अमोल केन्द्रे, हर्षद घुसे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...