आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकदारांना माहिती न देताच शेअर्स विकले:अमरावतीमध्ये 79 जणांची 18 कोटी 56 लाखांनी फसवणूक, 6 जणांविरोधात गुन्हा

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या 79 जणांची 18 कोटी 56 लाख 73 हजार 634 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरुन आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करुन गुरूवारी (दि. 28) रात्री ब्रोकरेज कंपनीसह सहा जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल केला.

अमरावती जिल्ह्यातील रिषभ सिकची (वय २७) असे तक्रारदाराचे नाव आहे. तक्रारीनुसार, अनुग्रह स्टॉक अँड ब्रोकर प्रा. लिमिटेडचे संचालक परेश मुलजी कारीया, तेजीमंदी डॉटकॉमचे संचालक अनिल गांधी, एडलवाईज कस्टोडीअल सर्व्हिस, एनएसईचे एमडी विक्रम लिमये, एलएनएचईचे मुख्य रेग्युलेटरी ऑफिसर आणि सीडीएसएलविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीड वर्षे सुरळीत व्यवहार

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिषभ सिकची व इतर गुंतवणूकदारांनी 2018-19 मध्ये तेजीमंदी डॉटकॉमच्या माध्यमातून अनुग्रह स्टॉक अँड ब्रोकरसोबत संपर्क केला. त्यानंतर ‘अनुग्रह’च्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी डिमॅट खाते उघडत रोख व धनादेशाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. म्युच्यूअल फंडातही गुंतवणूक केली. अनुग्रहने गुंतवणूकदारांच्या जुन्या डीमॅट अकाऊंटमधील रक्कमही नव्या डीमॅट खात्यात वळती केली. 79 गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमधील व्यवहारासाठी ‘अनुग्रह’ला ‘पॉवर ऑफ अटर्नी’ दिली. त्यानंतर वर्ष ते दीड वर्षे सर्व सुरळीत सुरू होते. गुंतवणुकीद्वारे मिळणाऱ्या नफ्याची रक्कम गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होत होती.

गुंतवणूकदारांना अंधारात ठेवत निर्णय

मात्र, काही महिन्यानंतर ‘अनुग्रह’ने कस्टोडीअन म्हणून एडलवाईज कस्टोडीअल सर्व्हिससोबत व्यवहार केला. अनुग्रहने त्यांच्याकडे असलेल्या गुंतवणूकदारांचे शेअर्स गहाण ठेवून एडलवाईजकडून मोठी रक्कम उधार घेतली. हा व्यवहार गुंतवणूकदारांना अंधारात ठेवून झाला आहे. एडलवाईजला रक्कम वेळेत परत न केल्यामुळे एडलवाईजने अनुग्रहने गहाण ठेवलेले शेअर्स परस्पर विक्री केले आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केली. एडलवाईजने विक्री केलेल्या शेअर्समध्ये अमरावतीच्या तक्रारदारांचेही शेअर्स होते. ही बाब उजेडात आल्यानंतर सेबीने एनएससीला चौकशी करून अनुग्रहवर कारवाई करण्याचे निर्देश दले. मात्र, एनएससीने त्याकडे दुर्लक्ष केले, असे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात समोर आल्याचे सुत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...