आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यास अट:अनुदानाच्या नावावर फसवणूक, आरोपी तिवसा येथील रहिवासी, तळेगाव दशासर पोलिसांची कारवाई‎

चांदूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे‎ शेळीपालनाकरिता ९५ हजाराचे‎ अनुदान मंजूर झाल्याचे आमिष‎ दाखवून धनोडी येथील एका‎ व्यक्तीस दहा हजार रुपयांनी ‎ लुबाडल्याची घटना घडली.‎ याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी एका ‎आरोपीस अटक केली आहे. रामराव ‎ भीमराव ढोबळे (५०, राहणार ‎अशोकनगर तिवसा) असे अटक‎ केलेल्या आरोपीचे तर धनोडी‎ येथील केसरबाई राजकुमार चतुर‎ (रा. धनोडी) असे तक्रारदाराचे नाव‎ आहे.‎

चतुर कुटुंबातील केसरबाई चतुर‎ व त्यांची सून घरी असताना‎ दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती‎ त्यांच्या घरी आले. आम्ही चांदूर‎ रेल्वे पंचायत समिती कार्यालयात‎ नोकरीवर असल्याचे त्यांनी‎ सांगितले. हे सांगत असतानाच‎ पशुपालन योजनेअंतर्गत‎ शासनाकडून तुम्हाला (केसरबाई‎ ‎चतुर यांना) ९५ हजार रुपयांचे‎ अनुदान मंजूर झाल्याची माहितीही‎ त्यांना दिली. हे अनुदान प्राप्त करुन‎ घेण्यासाठी त्या अनो‌ळखी व्यक्तींनी‎ केसरबाई यांना आधार कार्ड, रेशन‎ कार्ड, दोन पासपोर्ट फोटोंची मागणी‎ केली तसेच स्वहिस्सा म्हणून आधी‎ १० हजार रुपये भरावे लागतील,‎ असेही सांगितले.‎

९५ हजार रुपयांचे अनुदान‎ मिळणार असल्याने केसरबाई चतुर‎ यांनी लगेच त्यांना कागदपत्रे व‎ रक्कम दिली. ही रक्कम घेतल्यानंतर‎ दोन्ही भामट्यांनी तेथून पळ काढला.‎ आपली फसवणूक झाल्याचे‎ क‌ळताच चतुर कुटुंबीयांनी तळेगाव‎ दशासर पोलिसांकडे तक्रार दाखल‎ केली. पोलिसांनी याप्रकरणी रामराव‎ ढोबळे यास अटक केली असून,‎ त्याच्या ताब्यातून दहा हजार रुपये व‎ दुचाकी जप्त करण्यात आली. अन्य‎ दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.‎ या प्रकरणाचा तपास ठाणेदार हेमंत‎ चौधरी यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.‎

बातम्या आणखी आहेत...