आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान आवास योजने अंतर्गत स्वतंत्र मायक्रो फायनान्स आणि नमस्ते फायनान्स या कंपनीने ६० लाभार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोप भीम ब्रिगेडने केला. त्यामुळे या दोन्ही फायनान्स कंपनीवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
मनपा अंतर्गत सन २०१६ मध्ये पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलला लाभ देण्यात आला. ज्या लाभार्थ्यांचे दारिद्र्य रेशचे कार्ड नाही, तसेच ओबीसी प्रवर्गात मोडतात अशांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला. तपोवन प्रभागातील कृष्ण नगर, म्हसला-२२ येथे ९६ लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात आला. यातील ५० ते ५५ लाभार्थीनी स्वतंत्र मायक्रो फायनान्स व नमस्ते फायनान्समधून लोन घेतले. अजूनही मनपाने लाभार्थ्यांना त्या घराचा ताबा दिला नसल्याचे भीम ब्रिगेडचे म्हणणे आहे. परंतु, ईएमआय व व्याजाचे पैसे मागील १८ महिन्यांपासून लाभार्थींच्या खात्यातून कपात होत आहे.
सोबतच फायनान्स कंपनी व्याज वसुली सक्तीची करत आहे. करारानुसार, जोपर्यंत लाभार्थ्यांना ताबा मिळणार नाही, तोपर्यंत ईएमआय किंवा खात्यातून व्याज कपात होणार नाही. मात्र, या कंपन्यांकडून ५० ते ५५ लाभार्थ्यांच्या खात्यातून रक्कम कपात होत असल्याचे भीम ब्रिगेडचे म्हणणे आहे. फायनान्स कार्यालयात कंपनीचे कर्मचारी उपस्थित नसतात. त्यामुळे मायक्रो फायनान्स आणि नमस्ते फायनान्सवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी राजेश वानखडे, विक्रम तसरे, प्रवीण मोहोड, नितीन काळे, शरद वाकोडे, अंकुश आठवले, अविनाश जाधव, गौतम सवाईसह नागरिक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.