आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक चोरी:चनादाळ, कपड्यांचा चोरी गेलेला ट्रक दोन तासात फ्रेजरपुरा पोलिसांनी शोधला

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चना डाळीने भरलेला ट्रक चोरी गेल्यानंतर माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच या घटनेचा उलगडा केला. फ्रेजरपुरा पोलिसांनी बडनेरापासून पाच किमी समोर अकोला मार्गावरुन तो ट्रक जप्त केला. विशेष म्हणजे ट्रकमध्ये असलेला संपूर्ण माल ‘जैसे थे’ होता.

ट्रकचालक वसीम खान जमील खान (३४) हे शैलेश मदनलाल राठी (४७, रा. सक्करसाथ) यांच्या मालकीचा ट्रक चालवतात. शनिवारी रात्री वसिम खान हे वर्धा येथून ११० क्विंटल चना डाळ व ३ कापडाच्या डाक घेवून अमरावतीत आले होते. त्यांनी शनिवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास हा माल भरलेला ट्रक चपराशीपुरा येथे उभा केला आणि ते व सहकारी वाहक घरी गेले. रविवारी सकाळी हा ट्रक घेऊन ते स्थानिक एमआयडीसीमध्ये जाणार होते. दरम्यान रविवारी सकाळी साडेनऊ वाजता ट्रकचालक चपराशीपुरा परिसरात गेले असता त्यांना त्या ठिकाणी ट्रक दिसला नाही. त्यामुळे ट्रकमालक शैलेश राठी यांनी फ्रेजरपुरा पोलिसांकडे धाव घेतली. त्यावेळी फ्रेजरपुरा पोलिसांनी ट्रकची शोध मोहीम राबवून तो ट्रक अकोला मार्गावरून ताब्यात घेतला. ही कामगिरी फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर, पोलिस निरीक्षक नितीन मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गजानन राजमलू व त्यांच्या पथकाने केली डिझेल संपले व ट्रक बंद पडला चोरटे हा ट्रक अकोला मार्गाने घेऊन जात होते. मात्र ट्रक सुरू करताना डायरेक्ट (विना चाबी) सुरू केला होता. तसेच ट्रकमध्ये डिझेल फारच कमी होते. त्यामुळे चोरट्यांकडून हा ट्रक बंद पडला. तो नंतर सुरू न झाल्यामुळे चोरटे सापडले.

बातम्या आणखी आहेत...