आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या, नागरी सेवा परीक्षा-२०२३ (आयएएस, आयपीएस, आयएफएस) करीता विनामूल्य पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी ‘भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र’ कार्यरत आहे. या केंद्रात प्रवेशासाठी राज्य स्तरावरून ऑफलाइन पद्धतीने प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी जाहिरातीत नमूद केलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर अर्ज ऑनलाइन पद्धतीने २५ नोव्हेंबरपर्यंत भरता येतील. प्रवेश परीक्षा ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत राहिल. परीक्षेची माहिती www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका डॉ. संगीता कपडे यांनी कळवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.