आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऐकू न येणाऱ्या अथवा बोलता न येणाऱ्या मुलांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. मात्र, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमासारख्या विविध उपक्रमांमधून या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहे. जिल्ह्यात कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया १० बालकांवर मोफत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ही बालके बोलू व ऐकू लागली आहेत. कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया बालकांवर केली जाते. या शस्त्रक्रियेसाठी २० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो. हा संपूर्ण खर्च राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाने केला आहे.
बाळ जन्मायला आल्यानंतर त्याला ऐकू येत नसेल, तर त्याला बोलण्याचाही त्रास होतो. कारण त्यांनी काहीही ऐकलेले नसल्याने बाेलण्याची शैलीच त्यांना अवगत होत नाही. अशा बालकांना ऐकू यावे, यासाठी श्रवणयंत्र दिले जाते. जन्मतः ऐूु व बोलू न शकणाऱ्या ० ते २ वयोगटातील बालकांवर जिल्हास्तरावर कान-नाक-घसा तज्ञांमार्फत तपासणी करण्यात येते. तपासणीअंती कॉक्लिअर इंम्प्लांट या शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांवर राज्यस्तरावरुन सामंज्यस्य करार झालेल्या खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येते. कॉक्लिअर इंम्प्लांट या शस्त्रक्रियेचा खर्च अंदाजे ५ लक्ष २० हजार असुन ही महागडी शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत मोफत करण्यात येते.
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १० बालकांवर कॉक्लिअर इंम्प्लांट ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे. तसेच शून्य ते दहा वर्षे वयोगटांतील १३ बालकांना अत्याधुनिक श्रवणयंत्र मोफत देण्यात आले आहे. त्याचबरोबर हृदयविकार ६५ व इतर १५३ अशा एकूण २१८ शस्त्रक्रिया सात महिन्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.
हृदय तसेच इतर शस्त्रक्रिया विनामूल्य
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभाग हे एक ते अठरा वर्षापर्यंतच्या मुला-मुलींसाठी आरोग्य सेवा देते. या योजनेंतर्गत बालकांची हृदय तसेच इतर शस्त्रक्रिया मोफत करण्यात येते. ऐकू व बोल न शकणाऱ्या दोन वर्षापर्यंतच्या बाळांचीही महागडी शस्त्रक्रिया ही नि:शुल्क केली जाते. जिल्ह्यात अशा दहा बालकांच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे.
इतर बालकांवरही मोफत उपचार
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हयामध्ये १ एप्रिल २०१३ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबवण्यात आला. जिल्हयामध्ये एकुण ३२ पथके कार्यरत असून, अंगणवाडी व शाळेतील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येते. यात ० ते ६ वयोगटातील अंगणवाडीमधील २ लाख २२ हजार ९१३ बालकांची आणि ६ ते १८ वयोगटातील शाळेतील वयोगटातील १ लाख ७६ हजार ७१८ विद्यार्थ्यांची असे एकूण ३ लाख ९९ हजार ६३१ तपासणी करण्यात आली. तसेच ३ लाख ४ हजार ६०१ बालकांवर किरकोळ उपचार करण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.