आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार:उद्या नि:शुल्क नेत्र, त्वचारोग तपासणी; फिजिओथेरपी शिबिर‎

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवधारा नेत्रालयाद्वारे रविवारी (दि. ९)‎ सकाळी अकरा ते दुपार एक या वेळात एकाच‎ वेळी चार नि:शुल्क तपासणी शिबिरांचे‎ आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नेत्ररोग‎ तपासणी, कान, नाक व घसा रोग तपासणी,‎ त्वचारोग तपासणी व फिजिओथेरपीचा‎ समावेश आहे. शिबिर शिवधारा नेत्रालय,‎ द्वारकानाथ सोसायटी, दस्तूर नगर चौक, शंकर‎ नगर रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात‎ आले आहे.‎ शिबिरामध्ये डोळ्यांच्या सर्व आजारांची‎ तपासणी, चश्मा नंबर, मोतिया बिंदू,‎ डोळ्यांमधून पाणी येणे, खाज येणे, दूर‎ जवळच्या नजरेची तपासणी आणि डोळ्यांच्या‎ इतर तपासण्यांसह मार्गदर्शन करण्यात येईल.‎

यासोबत कान, नाक व घसा रोग तपासणी‎ शिबिरामध्ये संबंधित सर्व रोगांची तपासणी व‎ उपचार केले जाईल. चर्मरोग तपासणी‎ शिबिरामध्ये डॉ. अंशू चांडक त्वचा रोग, खाज‎ येणे, केस गळणे, त्वचे संबंधित सर्व रोगांचे‎ निदान, उपचार व मार्गदर्शन करण्यात येईल. डॉ.‎ रोमा बजाज या फिजिओथेरपी शिबिरादरम्यान‎ फ्रॅक्चर किंवा ऑपरेशन झाले असेल किंवा‎ ज्यांना कमरेचे दुखणे, पाठ दुखी, हाडांसंबंधी‎ दुखणे यासाठी व्यायाम, उपचार व मार्गदर्शन‎ करतील. मोठ्या संख्येने गरजू रुग्णांनी‎ शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन शिवधारा‎ नेत्रालयाद्वारे करण्यात आले आहे.‎