आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल संभ्रम पसरवून समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी चालवला आहे. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या सावरकर यांचे खरे जीवनचित्र समाजापुढे यावे या दृष्टीने भाजप अमरावती शहर, जिल्ह्याद्वारे मंगळवार, ४ एप्रिलला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रपरिषदेत देण्यात आली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी मी माफीवीर नाही, असे म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करतात, त्याचा निषेधही पत्रपरिषदेत करण्यात आला. गौरव यात्रेचा शुभारंभ बडनेरा नवीवस्ती येथील आठवडी बाजार चौक (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथून सायंकाळी ५ वाजता होईल.
या ठिकाणी मान्यवरांच्या मनोगतानंतर गौरव यात्रा जुनीवस्ती बडनेरा मार्गे साईनगरातील बेनाम चौक, गोपाल नगर चौक, नवाथे चौक, राजापेठ भाजप कार्यालय, राजकमल चौक, जयस्तंभ चौक मार्गे जवाहर गेट येथून प्रताप चौक, जैन मंदिर व पुढे भाजीबाजार चौक येथे पोहोचेल. मान्यवरांच्या समारोपीय भाषणानंतर यात्रेचा समारोप होईल.रॅलीत खा. अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे, भाजप शहर अध्यक्ष किरण पातुरकर, भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, प्रा. रवींद्र खांडेकर, जयंत डेहणकर, तुषार भारतीय, डाॅ. नितीन धांडे, माजी महापौर चेतन गावंडे, संजय नवरणे, संध्या टिकले, गजानन देशमुख, मंगेश खोंड, दीपक खताळे यांच्यासह भाजप नेते उपस्थित राहतील. पत्रपरिषदेला आ. प्रवीण पोटे, शहर भाजप अध्यक्ष किरण पातुरकर, शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, गजानन देशमुख, मंगेश खोंडे, दिपक खताळे उपस्थित होते.
भाजप साईनगर प्रभागाद्वारे गौरव यात्रेचे होणार स्वागत गौरव यात्रेचे माजी सभागृह नेते तुषार भारतीय यांच्याद्वारे भाजप साईनगर प्रभागाद्वारे स्वागत करण्यात येणार आहे. यात्रेचे नेतृत्त्व आ. प्रवीण पोटे, माजी आ. संजय कुटे करणार असून जयंत डेहनकर, शिवराय कुळकर्णी हे सहसंयोजक आहेत. माजी नगरसेवक प्रणीत सोनी, लता देशमुख हे मुख्य संयोजक आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.