आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा उपक्रम:15 सप्टेंबरपासून जि.प.चा स्वच्छता ही सेवा उपक्रम

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा स्वच्छ भारत मिशन, जिल्हा परिषद अंतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” या मोहीम राबवण्यात येत आहे. यावर्षी या उपक्रमाची सुरुवात १५ दिवस आधीच झाली आहे. जि.प. आणि पंचायत समिती अमरावतीने वलगाव येथे अमरावती ते अचलपूर रस्त्यावरील सर्व कचरा उचलून रस्ता स्वच्छ केला असून, उपक्रमाचा श्रीगणेशा केला. तत्पूर्वी, यंदा मोहिमेची गावांची दृश्यमान स्वच्छता ही थीम आहे.

दरवर्षी संपूर्ण भारतभर स्‍वच्‍छता ही सेवा उपक्रम राबवण्‍यात येते. या वर्षीही जिल्हा परिषदेच्या वतीने १५ सप्‍टेबर ते २ आॅक्‍टोबर २०२२ या कालावधीत स्‍वच्‍छता ही सेवा उपक्रम राबवून जिल्‍हयातील सर्व गावांमध्‍ये सार्वजनिक ठिकाणांची श्रमदानातून स्‍वच्‍छता करण्‍यात येणार आहे. या बाबत जिल्‍हयातील सर्व गट विकास अधिकारी तथा सरपंच यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्राद्वारे कळवलेले आहे. तत्पूर्वी या उपक्रमाची १५ दिवस आधीच जिल्‍हा परिषद व पंचायत समिती अमरावती यांनी स्‍वच्‍छतेसाठी श्रमदान उपक्रम हाती घेतला.

वलगांव ग्राम पंचायत सरपंच मोहिनी मोहोड, पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी जितेंद्र देशमुख तसेच बीआरसी कक्षातील सर्व कर्मचारी तसेच स्‍वच्‍छ भारत मिशन कक्ष जिल्‍हा परिषद अमरावती येथील कर्मचारी यांनी वलगांव येथे अमरावती ते अचलपूर रस्‍त्‍यावरील सर्व कचरा उचलून रस्‍ता स्‍वच्‍छ करण्‍यात आला. स्‍व्‍ाच्‍छतेसाठी श्रमदान करुन स्‍वच्‍छता ही सेवा उपक्रमाची १५ दिवसाआधी सुरुवात करुन दिली आहे. त्‍यामुळे सर्व जिल्‍हयातील गावांमध्ये सुद्धा याच पद्धतीने स्‍वच्‍छता होईल, असा विश्‍वास पाणी व स्‍वच्‍छता विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी यावेळी व्‍यक्‍त केला. या उपक्रमात सर्व ग्रामस्‍थ, कर्मचारी, युवक-युवती यांनी सक्रिय सहभाग घेवून आपला गाव, परिसर स्‍वच्‍छ करावा, तो नियमित स्‍वच्‍छ ठेवावा असे आवाहनही कुलकर्णी यांनी ग्रामस्‍थांना केले. यावेळी सचिव संजय चौधरी, प. स.अमरावतीचे कर्मचारी रूपाली धस्कट, जयश्री चौधरी, समूह समन्वयक, जि.प. कर्मचारी बाळू बोर्डे, धनंजय तिरमारे, नीलेश नागपुरकर, दिनेश गाडगे, प्रदीप बद्रे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

गावांमध्ये दृश्यमान स्वच्छता, या उपक्रमांचा समावेश
गावांमध्ये दृश्यमान स्वच्छता, गावातील कचरा कुंड्या आणि असुरक्षित ठिकाणची साफसफाई करणे, ओला आणि सुका कचरा वेगळे करण्यासाठीची जनजागृती, प्लास्टिकसारख्या अविघटनशील कचरा एकत्रित करणे, पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ करणे आणि सभोवती वृक्षारोपण करणे, सरपंच संवाद, प्लास्टिक बंदी, स्वच्छता या विषयावर वक्तृत्व, निबंध, रांगोळी, सजावट व देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी गणेश मंडळांना आवाहन करणे, प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वच्छता ही सेवा या विषयाची स्वच्छता दिंडी काढणे.

बातम्या आणखी आहेत...