आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि चार नगरपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाचा 12 कोटी 70 लाख 21 हजार 454 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून घनकचरा व्यवस्थापन आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची कामे सुरु झाली आहेत. चालू आर्थिक वर्षातील हा पहिला हप्ता असून या स्थानिक स्वराज्य संस्थांना एवढीच रक्कम दिवाळीच्या आसपास पुन्हा प्राप्त होणार आहे.
हा निधी देताना तो त्या-त्या शहरातील शासकीय व निमशासकीय इमारतींमध्ये ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’च्या कामांसाठी उपयोगात आणावा, अशी अट घालण्यात आली आहे. त्यानुसार तिवसा आणि वरुड या दोन नगरपालिकांनी तसे प्रस्ताव तयार करुन ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन विभागाकडे पाठविले आहेत. दरम्यान सहायक आयुक्त कार्यालयातील यंत्रणेने या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मंजुरीची प्रक्रिया सदर विभागाने हाती घेतली असून लवकरच दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष कामकाज सुरु होणार आहे.
त्यामुळे येत्या काळात त्याठिकाणी घनकचरा व्यवस्थापन व पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करुन पिण्याच्या पाण्याची सोय निर्माण केली जाणार आहे. मुळात तशी अटदेखील हा निधी देताना घालण्यात आली आहे. यामध्ये ‘अ’ वर्ग नगरपरिषद असलेल्या अचलपुरला सर्वाधिक १.३८ कोटीचा निधी मिळाला असून सर्वात कमी ७.४३ लाख रुपये चिखलदरा नगरपरिषदेच्या वाट्याला आले आहे.
असे आहे निधी वाटप (आकडे कोटींत)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.