आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील माहुली (धांडे) येथील गाडगेबाबा गोरक्षण परिसरात आयोजित पर्यावरण सेवेच्या कृती कार्यक्रमात संपूर्ण दर्यापूर विभाग गृहरक्षक दल पथक, स्थानिक श्रीमती कोकीळबाई गावंडे महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाने सहभाग नोंदवला होता. दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेश बुरंगे यांच्या हस्ते दर्यापूर विभाग गृहरक्षक दलाचे पलटन नायक प्रवीण पातुरकर यांनी संपूर्ण गृहरक्षक पथकाच्या वतीने सन्मानाचा स्वीकार केला. यावेळी सर्व उपस्थितांनी गृहरक्षक पथकावर फुलांचा वर्षाव केला.
गाडगेबाबा गोरक्षणचे अध्यक्ष अनिल भारसाकळे यांनी डॉ. राजेश बुरंगे यांचा विभागीय कार्याबद्दल सत्कार केला. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानपत्र असलेले सतीश पाटील साखरे, प्रा. डॉ. हरदास आखरे, प्रा. डॉ. गजानन हेरोळे, प्रा. अर्चना तिवारी, रोहन बुंदेले, अमर कतोरे, दिंडी संच प्रमुख प्रमोद राऊत, शेखर पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अमर कोरे यांनी गीत सादर करून आपल्या गायन कलेचा परीचय करून दिला. सकाळ ते दुपार अशा प्रदीर्घ चाललेल्या या नियोजन पूर्ण उत्सव कार्यक्रमाचे सूत्रबद्ध नेतृत्व तथा सूत्रसंचालन गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष प्रा. गजानन भारसाकळे, प्रास्ताविक निवृत्त प्राचार्य गोपाळ बारब्दे, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अवघा गावडे यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालय कार्यक्रम अधिकारी प्रा. अर्चना तिवारी यांच्यासह विजय पाटील धुमाळे, संजय धोटे, आदित्य बारब्दे, प्रा. डॉ. अमित गावंडे, नीलेश मोहोड, उमेश इंगळे, संदीप पवार, संगम डोंगरे, विकास शिंगणे, गजानन शर्मा, नितेश इंगळे, पवन वाकोडे, आकाश नागपुरे, श्रीकृष्ण पोटे, संतोष गवई, राजेश ढोले, नितीन विधळे, केंद्र प्रमुख बाबूराव बांबल आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या प्रसंगी गोरक्षण स्थळावरील गाय-वासरांना मिष्ठान्न देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दरम्यान,आपल्या देशाला अधिकाधिक प्रगतीशील, सर्वांगीण सुंदर व सदैव सुसज्ज घडवण्याची राष्ट्रसेवा या कृतीशील मंत्राचे जतन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. राजेश बुरंगे यांनी केले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.