आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागाडगेनगर पोलिस पथकाने रविवारी (दि. २५) एका नॅनो कारमध्ये आयोडेक्स, झंडू बाम, मटण मसाला, मॅगी मसाला, इनोचा माल पकडला आहे. यामध्ये आयोडेक्स व झंडू बाम बनावट असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलिसांनी अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती दिली होती. दरम्यान, या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे.
विशेष म्हणजे एक ते दीड महिन्यांपूर्वी लक्ष्मीनगर भागात अशाचप्रकारे बनावट ‘इनो’ संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते. संतोष दौलतराम जसवाणी (२७), केवल कॉलनी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष जसवाणी रविवारी शेगाव ते रहाटगाव मार्गाने जात असताना त्याच्या नॅनो कारमध्ये असलेल्या मालामध्ये इनो, आयोडेक्स, झंडू बाम बनावट आहे, त्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी या कारमधील हे साहित्य जप्त केले आहे.
त्यामध्ये पोलिसांना मटण व चिकन मसाला २८ हजार, मॅगी मसाला तसेच ३६ हजार ६६० रुपयांचे इनो, १८ हजार ४४० रुपयांचे आयोडेक्स, १६ हजारांच्या झंडू बामच्या बॉटल व अन्य साहित्य असा सुमारे १ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दरम्यान आयोडेक्स, झंडू बामसह सर्वच मालाचे नमुने घेऊन अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने तपासणीसाठी पाठवले आहे. यापैकी झंडू बाम आणि आयोडेक्सचे पॅकींग प्रथमदर्शनी संशयास्पद वाटत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे हे जप्त करुन पोलिस सखोल तपास करणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.