आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती:गाडगेनगर पोलिसांनी पकडला शस्त्रसाठा; २१ तलवारींसह पिस्टल जप्त, ऑनलाइन तलवारी बोलवून करायचा विक्री

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच आरोपींसह शस्त्रसाठा जप्त करत पोलिसांनी अजूनही तलवारी जप्त होण्याची शक्यता वर्तवली

गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयसियाराम नगरमध्ये राहणारा एक युवक मागील काही दिवसांपासून ऑनलाइन तलवार, पिस्टल (रिव्हॉल्वर) अशी शस्त्रे बोलावून त्याची शहरात विक्री करत असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी बुधवारी त्याला पकडले. पोलिसांनी त्याने विक्री केलेल्या २१ तलवारी तसेच एक पिस्टल(रिव्हॉल्वर) जप्त केली आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.

अक्षय प्रमोद इंगळे (२०, रा. जयसियाराम नगर), समीर सुनील निकोसे, गोलू उर्फ मयूर दीपक चढार(२०), देवेंद्र उर्फ विकी संजय बागडे (२७) आणि सुरज काशिनाथ यादव (२७, रा. शोभानगर अमरावती) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले तसेच हवालदार शेखर गेडाम यांना माहिती मिळाली होती की, अक्षय इंगळेच्या घरात मोठ्या प्रमाणात तलवारी व इतर शस्त्र आहे, त्यामुळे पोलिस पथकाने अक्षयच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना एक रिव्हॉल्वर तसेच तलवार हे शस्त्र मिळाले. याचवेळी पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेतले. त्यावेळी अक्षयने सांगितले की, त्याने आजवर अनेक तलवारी ऑनलाइन खरेदी केल्या आहेत. खरेदी केलेल्या तलवारी तो शहरातील इतर काहींना विक्री करत होता.

विक्री केलेल्या तलवारी त्याने आतापर्यंत समीर, गोलू, देवेंद्र, सुरज यांना विक्री केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याही घराची झडती घेऊन त्यांना अटक केली. त्यावेळी पोलिसांना या चौघांच्या घरातून आणखी वीस तलवारी जप्त करण्यात यश आले. ही कारवाई पोलिसांनी बुधवारी दिवसभर केली आहे. या पाचही जणांच्या घरातून पोलिसांनी एकूण २१ तलवारी तसेच एक रिव्हॉल्वर जप्त केले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा साठा मिळाल्यामुळे हे शहरात काही घडवणार तर नव्हते ना, असा प्रश्न पोलिसांसमोरही उभा झाला आहे. मात्र, गाडगेनगर पोलिसांच्या कारवाईमुळे मोठी घटना टळली, अशी चर्चा या कारवाईनंतर शहरात सुरू झाली आहे. ही कारवाई ठाणेदार आसाराम चोरमले, एपीआय महेश इंगोले, शेखर गेडाम, सुभाष पाटील, रोशन वऱ्हाडे, उमेश भोपते, जयसेन वानखडे, पांडुरंग बुधवंत यांनी केली.

अजूनही तलवारी जप्त होण्याची शक्यता
अक्षय इंगळेने ऑनलाइन बोलावलेल्या तलवार व रिव्हॉल्वर विक्री केल्या. आतापर्यंत अक्षयसह पाच जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून २१ तलवारी व एक एअर पिस्टल जप्त केले. अक्षयने शहरात अजुनही काहींना तलवारी विकल्या असाव्यात, असा संशय आहे. आसाराम चोरमले, ठाणेदार, गाडगेनगर.

बातम्या आणखी आहेत...