आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजाआड:लिपिकाला ब्लॅकमेल करणारे दोघे गजाआड; पार्टिशनला छिद्र पाडून मोबाइल कॅमेऱ्याने काढला व्हिडिओ

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात राहणारा एक ५५ वर्षीय व्यक्ती वरुडात लिपिक पदावर कार्यरत आहे. त्या लिपिकाचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून दोघांनी त्याला दहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती. दरम्यान, लिपिकाने राजापेठ पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या दोघांना रंगेहाथ अटक केली. हा प्रकार राजा पेठ ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (दि. ९) रात्री घडला.

विजय शेषराव टिकस (३१, रा. वरुड) आणि प्रीतम रामराम सुर्वे (३८, रा. बहादा, वरुड) असे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहे. शहरातील ५५ वर्षीय व्यक्ती मुडमध्ये नोकरी करतो. तो दररोज येणे-जाणे करत असताना शहरातच राहणारी मात्र वरुडात नोकरी करणाऱ्या एका महिलेसोबत त्याची ओळख झाली. या दोघांची ओळखी प्रेमात रुपांतरीत झाली. दरम्यान लिपिकाने वरुडातच एक खोली भाड्याने केली होती.

या खोलीवर लिपिक व त्याची ही प्रेयसी महिला अधूनमधून जात होते. दरम्यान, लिपिकाच्या खोली शेजारी काही तरुण राहत होते. लिपिक व तरुणांच्या खोलीत पार्टिशनसाठी प्लायवुड लावले होते. याच प्लायवुडला छिद्र पाडून ते तरुण लिपिकाच्या खोलीत डोकावत होते. दरम्यान तरुणांचा विजय टिकस हा मित्र असल्याने तो एक दिवस खोलीवर गेला. त्याचवेळी लिपिक व त्याची प्रेयसी खोलीत होते. त्यावेळचे आक्षेपार्ह चित्रिकरण प्लायवुड वरील छिद्रातून मोबाइलमध्ये केले. दरम्यान, ३० मे रोजी लिपिकाला एक निनावी कॉल गेला व त्याने लिपिकाला सांगितले की, तुझे एका मुलीसोबतचे फोटो व व्हिडिओ आमच्याकडे आहेत. ते आम्ही व्हायरल करु, जर असे करायचे नसेल तर मोर्शीत येऊन आम्हाला पाच लाख रुपये दे. मात्र. लिपिकाने त्या कॉलकडे लक्ष दिले नाही.

बातम्या आणखी आहेत...