आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस कमिटीतर्फे शास्त्री, बापूंना अभिवादन:महात्माजींनी जगाला सत्य, अहिंसा, सहिष्णुतेची शिकवण दिली; जिल्हाध्यक्ष बबलू देशमुखांचे प्रतिपादन

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण जगाला महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि सहिष्णुतेची शिकवण दिली. तर ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा करून तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी शेतकऱ्यांना विकासाच्या उंबरठ्यावर नेले, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले आहे.

गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त आज, रविवारी सकाळी या दोन्ही महामानवांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे, बँकेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश काळबांडे, बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड, जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयंतराव देशमुख यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रतिमेचे पूजन

सर्वांनी प्रेरित होऊन या महामानवांचे विचार अंगीकारावे, असे आवाहनही बबलू देशमुख यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले, महात्मा गांधीनी जगाला सत्याच्या मार्गावर चालून आपली प्रगती कशी करावी, याची शिकवण दिली. त्यांची हीच शिकवण सर्वांनी अंगीकारणे गरजेचे आहे. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे, प्राचार्य प्रकाश काळबांडे, संचालक हरिभाऊ मोहोड यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

आदींची उपस्थिती

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या या सोहळ्याला जिल्हा बँकेचे माजी संचालक संजय वानखडे मार्डीकर, भागवतराव खांडे, संजय लायदे, ईश्वर बुंदेले, अमोल जाधव, पंकज विधळे, दिलीप मालपे, समाधान दहातोंडे, बिट्टू मंगरोळे, विठ्ठलराव सरडे, विषाल भट्टड, राजाभाऊ पाथरे, सिद्धार्थ बोबडे, बबलू बोबडे, नंदकिशोर यादव, शेखर दाभणे, विनोद गुडधे, मयूर देशमुख आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...