आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दख्खन मराठा कुणबी समाजाचा मेळावा:गुणवंत विद्यार्थी व विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा सत्कार

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती येथील बडनेरा रोड स्थित जाधव पॅलेस सभागृहात दख्खन कुणबी समाजचा मेळावा नुकताच पार पडला. समाजातील गुणवंत विद्यार्थी व विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा सत्कारही या मेळाव्यात करण्यात आला.

आमदार प्रतापराव अडसड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अरुणभाऊ अडसड, महसूल उपायुक्त श्यामकांत मस्के, प्रा. राजेंद्र भांडवलकार, ज्येष्ठ पत्रकार मनोहर परिमल, नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचे माजी उपसभापती पुरुषोत्तमराव मोरे, डॉ. प्रवीणकुमार बोडखे, बाबाराव अडसड, निवृत्त उच्चाधिकारी सुधाकरराव काटे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विधार्थी तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवाचा जेष्ठ नेते अरुणभाऊ अडसड यांचे हस्ते भावपूर्ण सत्कार करणयात आला. माजी प्राचार्य डॉ. अरूण देशमुख, अॅड. मुरलीधर चोपडे, कार्याध्यक्ष प्रवीण परिमल, प्रा. विजय कुंटे, भानुदास शिंदे, बोराडे, मोहन मोरे, सुनील नाईक, डॉ बाबासाहेब शिंदे, निवृत्ती मोरे, उमेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

सांगता सामुहिक राष्ट्रगीताने

प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलित करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता सामुहिक राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे संचालन अनिता चोपडे यांनी केले. तर आभार डॉ. पंकज मोरे यांनी मानले.

समाजमन सुखावले

या कार्यक्रमामुळे गुणवंत विद्यार्थी आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक सुखावले आहेत. गुणवंतांना पुरस्कृत केल्यामुळे आमच्यासारखे आणखी काही गुणवंत निर्माण होतील, अशी प्रतिक्रिया ज्यांचा सत्कार करण्यात आला, त्यांच्यापैकी काहींनी व्यक्त केली. या कार्यक्रमामुळे एक नवी उर्जा प्राप्त झाली, असेही काही सत्कारार्थींचे म्हणणे होते.

बातम्या आणखी आहेत...