आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्तीपत्रे:महावितरण; एसटीच्या 109 जणांना मंत्र्यांच्या हस्ते नोकरीची नियुक्तिपत्रे

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने नोकरीची धडक मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत गुरुवारी येथे वीज कंपनीच्या ९६ आणि एसटी महामंडळाच्या १३ अशा १०९ उमेदवारांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली. येत्या काळात इतरही विभागातील भरतीचा अनुशेष दूर केला जाणार असून, अनेक बेरोजगारांना रोजगार प्रदान केला जाईल, असे आश्वासक विधान अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

राज्य शासनाने सुरु केलेल्या महासंकल्प-महारोजगार मोहिमेचा अमरावती विभागीय कार्यक्रम आज दुपारी येथील नियोजन भवनात पार पडला. यावेळी ते बोलत होते. मंचावर विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपायुक्त संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, प्रादेशिक वनसंरक्षक जी. के. अनारसे, महावितरणच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, पारेषणचे मुख्य अभियंता जयंत विखे, महावितरणच्या अकोला परिक्षेत्राचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, सहायक महाव्यवस्थापक सूर्यकांत फलटणकर, मनीष भोपळे, परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे आदी उपस्थित होते.

७५ हजार युवकांना देणार रोजगार
७५ हजार युवकांना रोजगार देण्याचा राज्य शासनाने संकल्प केला आहे. शासकीय नोकरीचे स्वप्न बाळगणाऱ्या व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांचे या उपक्रमाच्या माध्यमातून स्वप्न साकार होत आहे. या माध्यमातून सर्वसामान्यांच्या सेवेची संधी उमेदवारांना प्राप्त होत आहे. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी संघटितपणे कार्य करु या, असे आवाहनही मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...