आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे सुमारे दोन वर्ष बंद असलेले जनरल तिकीट बुधवार २९ पासून रेल्वेद्वारे पुन्हा सुरू करण्यात आले असून शहरातील मॉडेल रेल्वे स्थानकावरील दोन काउंटरवर जनरल तिकीट मिळणार आहे. त्यामुळे ऐनवेळी अत्यावश्यक कामासाठी निघालेल्या प्रवाशांची सोय होणार आहे.
अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावरून मुंबईला जाणाऱ्या अंबा एक्स्प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. बरेचदा ऐनवेळी आरक्षणच मिळत नाही. तसेच आजवर विना आरक्षण जनरल डब्यांमध्येही प्रवास करता येत नव्हता. त्यामुळे जर ऐनवेळी आणिबाणीच्या परिस्थितीत कोणाला मुंबईपर्यंत किंवा मार्गातील इतर शहरांपर्यंत प्रवास करायचा असेल तर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागयचा. मात्र जनरल तिकीट मिळणार असल्यामुळे प्रवाशांना आरामात नव्हे पण, कसातरी प्रवास करता येईल.
माॅडेल रेल्वे स्थानकावर ऐनवेळी गर्दी होऊ नये म्हणून दोन जनरल तिकीटचे काउंटर ठेवण्यात आले आहेत.यापुढे तिकीट काऊंटरसह आॅटोमॅटीक तिकीट व्हेंडिंग मशीन, युटीएस मोबाईल अॅपद्वारे जनरल तिकीट काढता येणार आहे. अनेक प्रवासी मंगळवार २८ रोजीच रेल्वे स्थानकावर येऊन जनरल तिकीट उद्यापासून सुरू होणार काय, अशी विचारणा करून गेल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आली. अंबा एक्सप्रेसची वेळ झाली की, माॅडेल रेल्वे स्थानकावर दोन वर्षांपूर्वी जनरल तिकीट घेणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा दिसायचा. तशाच रांगा आता बुधवारपासून पुन्हा दिसतील.
दरम्यान, रेल्वे गाड्यांसाठी कोरोना काळापासून नागरिकांना आरक्षित तिकिट काढूनच प्रवास करावा लागत होता. ते आर्थिकदृष्ट्या महागडेही होते. जनरल तिकिट सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दोन काउंटरवर मिळणार जनरल तिकीट
अमरावती माॅडेल रेल्वे स्थानकावर बुधवार २९ पासून दोन काउंटरवर प्रवाशांना जनरल रेल्वे तिकीट मिळणार आहे. प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून दोन काउंटर ठेवण्यात आले आहेत.
-एम.एस.लोहकरे, प्रबंधक, अमरावती रेल्वे स्टेशन.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.