आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:काँग्रेसचे ‘मजीप्रा’समोर ‘घागर फोडो’ ; संतप्त पदाधिकारी, नागरिकांचे आंदोलन;

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी काँग्रेसने मागणी केली. मात्र, मजीप्रा प्रशासन झोपी गेल्याचा आरोप काँग्रेसने केला. या दरम्यान जलवाहिनी फुटल्यामुळे अचानक पाणीपुरवठा बंद केला. त्यामुळे शहरवासी यांमध्ये असंतोष आहे. मजीप्राकडे कोणतेही नियोजन नसल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, या विरोधात मंगळवारी संतप्त पदाधिकारी नागरिकांसह खाली घागर घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांवर पोहोचली. यावेळी संतप्त पदाधिकाऱ्यांची घागर फोडून निषेध व्यक्त करत निदर्शने केली. तसेच शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, यासह अन्य मागण्यांसाठी मजीप्रा कार्यकारी अभियंत्याला निवेदन दिले. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारे मनपा क्षेत्रात पाणीपुरवठा बंद झालेला आहे. त्यात अचानक पाणीपुरवठा बंद केल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून, सर्वांची तारांबळ उडाली. मजीप्रा प्रशासनाने जलवाहिनी फुटल्याचे सांगण्यात आले, मात्र, गेल्या ३ दिवसांपासून जलवाहिनी दुरुस्तीचे काम संथगतीने झाले. अचानक पाणीपुरवठा बंद पडला तर मजीप्रा प्रशासनाकडे उपाययोजना निश्चित नसल्याचे मजीप्रासाजे नियोजन शून्य आहे. त्यामुळे यानंतर पाणीपुरवठा खंडित करावयाचा असल्यास त्याची पूर्वसूचना जनतेला एसएमएस, प्रसारमाध्यमातून देण्यात यावी, तसेच नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करावी, आदीं मागण्यांना घेऊन शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन कार्यालयाबाहेर घागर फोडो आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष भैया पवार, फिरोज खान, माजी महापौर वंदना कंगाले, शोभा शिंदे, श्याम देशमुख, जयश्री वानखडे, अभिनंदन पेंढारी, मुन्ना राठोड, अंजली उघडे, गोपाल धर्माळे, नीलेश गुहे, अब्दुल रफिक, विजय आठवले, अनिल देशमुख, फिरोज शाह, विजय आठवले, कलीम शाह, रमेश राजोटे, वैभव देशमुख, नितीन काळे, असलम सलाट, अतुल कालबेंडे, गुड्डू हमीद, प्रदीप वानखडे, विनोद सुरोसे, शारिक अहेमद, प्रभाकर वाळसे, मुकेश चांगानी, विजय खंदारे,अरुण बनारसे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...