आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोरपडीसह एकाला ताब्यात‎:घोरपड पकडली, भाजली अन्‎ खाणार तोच वन विभागाने पकडले‎

अमरावती‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून कठोरा गावाकडे जाणाऱ्या ‎मार्गालगत काही मजूर झोपड्या‎ बांधून राहत आहेत. त्याच परिसरात ‎त्यांचे काम सुरू आहे. दरम्यान ‎ ‎ मंगळवारी (दि. ३) सायंकाळी पाच ‎वाजताच्या सुमारास एक व्यक्ती ‎घोरपड भाजत असल्याची माहीती‎ वन विभागाला मिळाली. या‎ माहीतीच्या आधारे वन विभागाच्या ‎ ‎ पथकाने भाजलेली घोरपड व‎ घोरपड भाजणाऱ्या व्यक्तीला‎ ताब्यात घेतले आहे. त्याने ही‎ घोरपड खाण्यासाठी भाजली होती‎ मात्र खाण्यापुर्वीच तो वन‎ विभागाच्या जाळ्यात आला आहे.‎ राजू श्याम रावजी शिंदे (४७, रा.‎ वाठोडा शुक्लेश्वर) याला‎ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.‎

कठोरा मार्गावर रस्त्याच्या कडेला‎ काही मजुरांच्या झोपड्या आहे. हे‎ मजूर याच भागात कामासाठी आले‎ असून त्यामध्ये राजू शिंदे आहे.‎ मंगळवारी दुपारी जेसीबी मशीनद्वारे‎ खोदकाम सुरू असताना शिंदेला‎ एक घोरपड दिसली. ती दिसताच‎ शिंदेची पकडली आणि तीला‎ खाण्यासाठी आणली.‎ झोपडीजवळ आणून घोरपड‎ भाजली. घोरपड भाजत असतानाच‎ ही माहीती वन विभागाच्या‎ पथकाला मिळाली. त्या माहीतीच्या‎ आधारे डाळीच्या आरएफओ वर्षा‎ हरणे, वनपाल श्याम देशमुख व‎ अन्य कर्मचारी त्या परिसरात‎ पोहोचले. वन विभागाच्या पथकाने‎ पाहीले असता शिंदे घोरपड भाजत‎ होता. त्यामुळे वन विभागाच्या‎ पथकाने ही भाजलेल्या स्थितीतील‎ घोरपड व शिंदेला ताब्यात घेतले.‎ शिंदेंविरुद्ध वन गुन्ह्याप्रमाणे‎ कारवाई करुन सखोल चौकशी‎ सुरू केली आहे. जप्त केलेली‎ घोरपड जवळपास एक फूट‎ लांबीची असल्याचे सूत्रांनी‎ सांगितले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...