आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:बालकाच्या मारेकऱ्यास फाशीची शिक्षा द्या ; वंचितची निवेदनाद्वारे मागणी

उमरखेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानातील जालौर जिल्ह्यातील आठ वर्षीय बालकाच्या मृत्यू प्रकरणात जबाबदार मुख्याध्यापकावर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. याबाबत ठाणेदारांना निवेदन देण्यात आले आहे.राजस्थानच्या जालौर जिल्हयातील सुराणा गावात आठ वर्षीय निरागस बालक इंद्र देवराम मेघवाल या बालकाने तहान लागल्याने शाळेतील माठातील पाणी पिल्याने छैल सिंह नावाच्या मुख्याध्यापकाने निर्दयीपणे बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. या हादरून टाकणाऱ्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ ढाणकी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीने निषेध सभा घेऊन व आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, पीडित कुटुंबाला तात्काळ एक कोटी रुपयांची मदत जाहीर करून, पिडित कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत सामील करण्यात यावे, राजस्थानमध्ये दलित आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे सरकार बरखास्त करावे, या मागणीचे निवेदन बिटरगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे, ढाणकी नगरपंचायतचे नगरसेवक संबंधी गायकवाड, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शहर प्रमुख शुभम गायकवाड, शाम राऊत, सुनील राऊत, राहुल विनकरे, विष्णू वाडेकर, आकाश गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, अनिकेत सावतकर, अभिजीत गाडेकरआदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...