आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट कार्ड:जिल्ह्यातील एड्सग्रस्तांना एसटीचे स्मार्ट कार्ड द्या

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एचआयव्ही एड्स या गंभीर आजाराशी झुंजत जगणाऱ्या जिल्ह्यातील ५० किमी. अंतरावरून शहरात येऊन एआरटी औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांना एसटीद्वारे स्मार्ट कार्ड देण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी एसटी विभागीय वाहतूक नियंत्रकांना एड्स आढावा बैठकीत दिले. १ डिसेंबरला जागतिक एड्स दिन असल्याने जागृतीसाठी ही बैठक घेण्यात आली.

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांद्वारे तृतीयपंथी, वारांगना तसेच एचआयव्ही एड्सग्रस्त रुग्णांना रेशन कार्डचे वाटप केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. एड्सग्रस्तांना रेशन कार्ड मिळाल्यानंतर ते बंद केल्याची माहिती अशासकीय संस्थांनी दिल्यामुळे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी या प्रकरणी सविस्तर माहिती घेण्याचीही सूचना केली. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी एड्सबाबत मागील आर्थिक वर्षांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील एड्सग्रस्तांना औषधोपचाराचे वार्षिक लक्ष्य पूर्ण केल्याबाबत कौतुक केले. बैठकीला रासेयोचे डॉ. राजेश बुरंगे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, मनपाचे डॉ. विशाल काळे, डाॅ‌. रमेश बनसोड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुभाष ढोले आदी उपस्थित होते.

विविध जनजागृती कार्यक्रम राबवणार
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालय अमरावतीद्वारे जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार असून, जनजागृती रॅली जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित केली जाणार आहे. या रॅलीला जिल्हाधिकारी हिरवी झेंडी दाखवतील. जनजागृती रॅलीद्वारे एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृतीला सहकार्य करावे असे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...