आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापहिली ते आठवीच्या १०० टक्के विद्यार्थ्यांना गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने मागणी केल्यानंतरही गणवेश दिले जात नाही. शासन शंभर टक्के मुली व मागासवर्गीय मुलांना गणवेशाचा पुरवठा करते त्यामुळे इतर विद्यार्थ्यावर मनावर जातीची बिजे शालेय जीवनातच पेरली जातात. याचा शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम होतो. म्हणूनच १०० टक्के विद्यार्थ्यांना जर शासनाने गणवेश पुरवले तर विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळेत वाढेल व त्यांच्या बालमनावर परिणाम होणार नाहीत. त्यामुळे महिला व बालविकास मंत्र्यांनी १०० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. शिक्षक समितीने अॅड. ठाकूर यांचे स्वागत करून त्यांना १०० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश द्यावा, अशी मागणी केली. या भेटीदरम्यान शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, कैलास ताठे, देविदास गायकवाड, पंडित शेजुळ, शेषराव दांडगे, दिलीप देवरे, विलास पठाडे ,भास्कर पठाडे, दादाराव काकडे, प्रज्ञा जोशी, पुष्पा बोरडे, संगीता पडघन, नीलेश ससाने, सुनील काचोळी यांची उपस्थिती होती. प्राथमिक शिक्षक समितीने यापूर्वी गणवेश सर्वांना मिळावे, अशी मागणी शासनाकडे लावुन धरली आहे. आता नवे शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील सर्व विद्यार्थांना मोफत दोन गणवेश देण्याची मागणी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय कोंबे,राज्य उपाध्यक्ष राजन कोरगांवकर, कार्याध्यक्ष राजेंद्र नवले समस्त राज्य कार्यकारीणी पदाधिकारी यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.