आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिशु अतिदक्षता:‘डफरीन’मध्ये वर्षभरात 2 हजार 258 बालकांना जीवनदान ; बाळांवर यशस्वी उपचाराची सुविधा

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथील एसएनसीयू विभागात प्रीमॅच्युअर तसेच कमी वजनाच्या बळांवर यशस्वी उपचार केले जात असून, यामुळे अनेक गरीब घरातील बालकांना नवजीवन मिळाले आहे. तसेच खासगी रुग्णालयात १० हजाराला मिळणारे इंजेक्शन येथे बालकांना नि:शुल्क दिले जाते. आवश्यकता भासल्यास महानगरांमध्ये उपचारार्थ बाळांना पाठवल्यास त्याचा खर्चही रुग्णालयाद्वारे केला जातो. गत एका वर्षात २ हजार२५८ नवजात बालकांवर यशस्वी उपचार झाले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या वाठोडकर यांनी दिली.

जिल्हा स्त्री रुग्णालय येथे गंभीर, तसेच कमी वजनाचे आणि कमी दिवसाचे नवजात बालकांना जीवनदान मिळावे, यासाठी २०१३ पासून एसएनसीयू (न्यूबॉर्न केअर युनिट) विभाग आहे. यामध्ये २७ अद्यावत बेड कार्यान्वित आहेत. या युनिटमध्ये दररोज ४० ते ४५ शिशूंवरील नियमित उपचार केले जातात. येथे मेळघाटसारख्या ठिकाणावरून बाळांना उपचार्थ दाखल केल्या जाते. गत वर्षी १०८ बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले. आतापर्यंत २२५८ गंभीर स्वरुपाची बालके भरती करण्यात आले असून, त्यातील १५०० ग्रॅम, ८००, ९०० ग्रॅमच्या नवजात बालकांचा समावेश आहे.

तसेच कमी दिवसाचे व कमी वजनांच्या ३६ बालकांना सर्फॅक्टंट इंजेक्शन देण्यात आले. हे इंजेक्शन खाजगी रुग्णालयात १० हजारांच्या किंमतीत आहे. मात्र, डफरीन येथे येणाऱ्या बालकांना निःशुल्क दिल्या जाते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या मार्गदर्शांत एसएनसीयू विभाग कार्यरत आहे. यामध्ये वैद्यकीय अधीक्षक विद्या वाठोडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. तलत खान, डॉ भरत गोयल, बालरोगतज्ज्ञ डॉ. नितीन बरडीया, डॉ. चेतन चव्हाण डॉ. विजया जायदे, डॉ. अमोल फाल, डॉ. अमोल अवघड, डॉ. सूरज राठी , डॉ सऊद अन्सारी, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. सचिन इंगोले, डॉ. अनिकेत तिडके, डॉ.पल्लवी भड आदी सेवारत आहेत.

बातम्या आणखी आहेत...