आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक ऑफ इंडिया:बावीस खातेदारांना अंधारात ठेवत त्यांच्या नावावर उचलले ‘गोल्ड लोन’

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युनियन बँक ऑफ इंडियाच्या राजापेठ शाखेत काही दिवसांपूर्वीच गोल्ड लोन घेणाऱ्या ग्राहकांचे खरे सोन्याचे दागिने बनावट झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केला आहे. दरम्यान, आज (१९) बँकेत जाऊन माहिती घेतली असता ५९ पैकी २२ खातेदारांना न कळवताच परस्पर त्यांच्या नावे गोल्ड लोन उचलण्यात आले असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे.

बँकेत सोने-तारण कर्ज योजनेत ९२ खातेदारांनी कर्ज घेतल्याचे सुरुवातीला समोर आले होते. त्यापैकी ५९ खातेदारांनी तारण ठेवलेले खरे सोने बनावट झाल्याची तक्रार बँकेकडून पोलिसांत करण्यात आली. दरम्यान, प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यामुळे सदर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला होता व गुरुवारपासून आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे पथक आज बँकेत गेले त्यावेळी माहिती समोर आली की, ५९ पैकी ३७ खातेदारांनी बँकेकडून गोल्ड लोन घेतले आहे. मात्र त्यांचेही खरे सोने बँकेत बनावट झाले. तसेच उर्वरित २२ खातेदारांना तर आपल्या नावे गोल्ड लोन आहे याबाबत माहितीच नव्हती. त्यांचे बँकेत खाते आहे, मात्र ते गोल्ड लोन त्यांच्या नावे कधी उचलण्यात आले. परस्परच त्यांच्या नावे गोल्ड लोन उचलण्यात आल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...