आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे क्राॅसिंग:गोपालनगर रेल्वे क्राॅसिंग आजपासून राहणार बंद

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या वर्षात २ ते ४ जानेवारी दरम्यान तीन दिवस गोपालनगर रेल्वे क्राॅसिंग बंद राहणार आहे. रेल्वेने रुळांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी गोपालनगर रेल्वे क्राॅसिंग बंद ठेवणार असल्याचे त्यांच्या पत्रकात म्हटले आहे. या ठिकाणी खरेच रेल्वे रुळांची देखभाल, दुरुस्ती केली जाणार की, गोपालनगर भुयारी मार्गाचे काम सुरू केले हे कळेनासे झाले.

यू टर्न आकाराच्या भूमिगत मार्गाचे काम सुरू झाले असावे, किंवा ते सुरू करण्याच्या उद्देशाने काही पाहणी, तपासणी केली जात असावी, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. कारण तीन दिवस गोपालनगर रेल्वे क्राॅसिंग बंद राहणार असल्याने नागरिकांना शहरात येण्यासाठी इतर मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...