आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांपासून आंदोलन:शिक्षक संघटनेचे जि.प. समोर बेमुदत उपोषण

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. शासनाकडून याकडे वारंवार दुर्लक्ष केल्या जाते. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या नेतृत्वात जि.प. प्रवेशद्वारासमोर दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी, आणि शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे शासन स्तरावरून होणाऱ्या दुर्लक्षामुळे शिक्षकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी निवेदने दिलीत. मात्र, शासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे.

जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करून बदली प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांची सर्व रिक्त पदे तत्काळ भरावी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, उच्च श्रेणी मुख्याध्यापक सर्व रिक्त पदे अर्हताधारक प्राथमिक शिक्षकातून १०० टक्के पदोन्नतीने भरावी, समान कामासाठी समान वेतन या धोरणास अनुसरून शिक्षकसेवक पद बंद करून मुख्यालयीन राहण्याचे आदेश रद्द करावे, यासारख्या मागण्यांसाठी जि.प.मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या नेतृत्वात जिल्हा परिषद मुख्य प्रवेशद्वाराजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये गजानन उके, सुधीर पातूरकर, विजय देशमुख, राजेंद्र कैथवास, विजय ठाकूर, रविकिरण सदांशिव आदींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...