आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदोन्नती‎:जि.प. आरोग्य विभागात‎ 14 कर्मचाऱ्यांची पदोन्नती‎

अमरावती‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विभागात कार्यरत १४‎ कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली‎ असून, शुक्रवारी याबाबतचे आदेश‎ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप‎ रणमाले यांनी काढले आहे. त्यामुळे‎ त्यांना पदस्थापना देण्याची प्रकिया‎ सुरू करण्यात आली आहे.‎ जिल्हा परिषदेच्या विविध‎ विभागांमघ्ये कर्मचाऱ्यांना पदोन्नती‎ देण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोग्य‎ विभागातील ३ आरोग्य सहाय्यक,‎ ६आरोग्य सेवक पुरूष व ५ आरोग्य‎ सेवक महिला अशा १४ कर्मचाऱ्यांची‎ यादी लावण्यात आली होती. याची‎ प्रक्रिया आरोग्य विभागामार्फत‎ राबवण्यात आली.

त्यामुळे ३ आरोग्य‎ सहाय्यकांना पर्यवेक्षकपदी पदोन्नती‎‎‎‎‎‎‎‎‎ देण्यात आली आहे. याशिवाय‎ आरोग्य सेवक व सेविका अशा ११‎ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यकपदी‎ पदोन्नती देण्यात आली. ही प्रक्रिया‎ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप‎ रणमाले यांच्या मागदर्शनात प्रशासन‎ अधिकारी लिलाधर नांदे, सानप,‎ मंगला वानखडे, ईश्वर राठोड, किरण‎ खांडेकर यांनी राबवली. लवकरच या‎ कर्मचाऱ्यांना पदस्थापना दिली जाणार‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...