आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौल:ग्रा. पं. 257, सर्वपक्षीयांची दावेदारी 434 वर; काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रिहर्सल असलेल्या २५७ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी दुपारी घोषित झाले. सरपंच पदासाठी थेट निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी अप्रत्यक्षपणे (चिन्ह नसल्यामुळे) या निवडणुकीत भाग घेतला होता. त्यामुळे निकाल घोषित झाल्यानंतर सर्वच पक्षांनी ‘दिव्य मराठी’कडे आपापली दावेदारी नोंदवली. त्यानुसार एकूण ४३४ पदांवर या पक्षांचे सरपंच विजयी झाले आहेत.

विशेष असे की काँग्रेस आणि युवा स्वाभिमान या दोनच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय संख्या असलेली लेखी यादी पुरवली. इतरांनी त्यांचे दावे तोंडी नोंदवले आहेत. वेगवेगळ्या दाव्यांनुसार काँग्रेस जिल्ह्यात सर्ंवात मोठा पक्ष ठरला असून या पक्षाचे तब्बल १४१ सरपंच विजयी झाले आहेत. त्याखालोखाल १२० जागांवर भाजपचे सरपंच विजयी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. युवा स्वाभिमान या आमदार रवी राणा-खासदार नवनीत राणा यांच्या पक्षाने ४७ गावचे सरपंचपद जिंकले असून, माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारला ४५ जागा मिळाल्या आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जिल्ह्यात ३० जागा मिळाल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ३५ जागा जिंकल्याचा दावा त्या-त्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी केला आहे. याशिवाय सहापेक्षा अधिक जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला ध्वज रोवला असून किमान १० जागी अपक्ष सरपंच विजयी झाले आहेत. काँग्रेसचाच दबदबा सत्ताधारी सतत अपेक्षाभंग करताहेत. त्याचा हा परिणाम असून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे तयार झालेली सकारात्मकता निकालातून प्रतिबिंबीत झाली आहे. -बबलू देशमुख, काँग्रेस जिल्हाध्यक्ष.

भाजपची घोडदौड सुरुच भाजपची विजयी घोडदौड या निकालातून दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारच्या दमदार कामगिरीवर लोकांनी कौल दिला आहे. -निवेदीता चौधरी, जिल्हाध्यक्ष, भाजप.

फुटीचा परिणाम नाही शिवसेनेत फुट पडली असली तरी जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धवजींच्याच बाजूने आहेत. ३० गावांतील सरपंचपद मिळाल्याने ही बाब अधिक चांगल्याप्रकारे अधोरेखित झाली आहे. -सुनील खराटे, जिल्हाप्रमुख, शिवसेना (उ.बा.ठा.)

यांनी उधळला विजयाचा गुलाल Á सर्व पक्षाच्या प्रमुखांनी आपापल्या गावांमध्ये सरपंचपद मिळवले. Á काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी त्यांच्या तळवेल (ता. चांदूरबाजार) ग्रामपंचायतीत अलका बोंडे विजयी झाल्या. Á चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा येथे ‘प्रहार’चे भय्यासाहेब कडू विजयी झाले. भय्यासाहेब कडू हे माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांचे थोरले बंधू आहेत. Á भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी त्यांच्या निंभोरा-देलवाडी (ता. तिवसा) येथे सत्ता मिळवली. तेथे वर्षा मनवर या सरपंचपदी विराजमान झाल्या. Á राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांनी त्यांच्या कामुंजा (ता. अमरावती) गावात सत्ता मिळवली असून तेथे नीता राऊत सरपंच बनल्या.

बातम्या आणखी आहेत...