आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारी दाखल:ग्रा. पं. निवडणूक, उमेदवारीसाठी उरले केवळ तीन दिवस

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींच्या १८ सप्टेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीचा ज्वर अजूनही फिकाच आहे. दरम्यान उमेदवारी दाखल करण्याला आता केवळ तीनच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मध्यंतरीच्या काळातील काही सुट्या आणि त्यानंतर आलेला शनिवार, रविवार यामुळे आता केवळ २९ व ३० ऑगस्ट तसेच १ सप्टेंबर या तीनच दिवसांत इच्छुकांना आपापली उमेदवारी दाखल करता येईल. अमरावती तालुक्यातील रोहणखेड, चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदूरवाडी, धारणी तालुक्यातील हरिसाल तसेच तिवसा तालुक्यातील घोटा, कवाडगव्हाण, उंबरखेड व आखातवाडा या सात ग्रा. पं.साठी २४ ऑगस्टपासून उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले. १ सप्टेंबर ही उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. हरिसाल ही ११, तर उर्वरित सहा ग्रामपंचायती सात सदस्यीय आहेत. शिवाय सरपंचाची निवडणूक थेट असल्यामुळे निवडणुकीअंती प्रत्येक ग्रामपंचायतीत एकेक सदस्य आणखी वाढणार आहे.

दरम्यान गेल्या आठवडाभरात धारणी तालुक्यातील हरिसाल आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदूरवाडी या दोनच ग्रा. पं.च्या सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून, तेथील सदस्यांसाठी प्रत्येकी चार याप्रमाणे आठ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...