आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:‘पदवीधर’मतदार नोंदणी, आज शेवटचा दिवस ; तहसील कार्यालयामध्ये ‘एक खिडकी’ सुरू

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदार नोंदणीसाठीचा शेवटचा दिवस अगदी काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी उद्या, सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नोंदणीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीची सोय उपलब्ध आहे. ऑफलाइन नोंदणीसाठी तहसील कार्यालयात ‘एक खिडकी’ उपक्रमही सुरू करण्यात आला आहे.

प्रभारी निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यामते पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी १ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार नोंदणी सुरू आहे. मतदारांच्या सोयीसाठी तहसील कार्यालयात एक खिडकी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहरातील सर्व झोनच्या मतदार नोंदणीसाठी फॉर्म क्र. १८ स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालयात एक खिडकी सुरू राहील. या कामासाठी अव्वल कारकून आशिष ढवळे, महसूल सहायक सुनील हिवराळे, कोतवाल प्रवीण माहुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पात्र व्यक्तींनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...