आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात मागील पंधरवड्यापासून हरभरा काढणीला चांगलाच वेग आला आहे. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. यावर्षी हरभरा पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने हरभऱ्याच्या उताऱ्यात मोठी घट येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दर्यापूर तालुक्यामध्ये गतवर्षी मुसळधार पाऊस व परतीच्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे हरभऱ्याच्या पीक पेरणी क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली होती. तालुक्यात १५ हजार ७०९ हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली असल्याचे तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार यांनी सांगितले.
यावर्षी हरभरा पिकावर रोगराई व हिवाळ्यातील धुआरीमुळे हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये मोठी घट येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच शासकीय हमीभावाच्या तुलनेत सद्यस्थितीत खुल्या बाजारात दरात देखील मोठी तफावत आहे. प्रत्यक्षात मार्चं महीना सुरू होऊनही ‘नाफेड’ची खरेदी केंद्रे सुरू झाली नसल्याने पैशाची गरज व देणी-घेणी असल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कमी दरात हरभरा विकावा लागत आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल ७०० ते ८०० रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे. शासकीय नाफेडची खरेदी केव्हा सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.