आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्ये ग्रामपंचायतीचा रणसंग्राम:अचलपूर तालुक्यातील 23 ग्रामपंचायत निवडणूक; 18 डिसेंबर रोजी होणार मतदान

अमरावती8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचलपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तालुक्यातील काकडा, असदपूर, शहापूर, सावळीदातुरा या ग्रामपंचायतीसह 23 ग्राामपंचायतीच्या निवडणूका 18डिसेंबर रोजी होणार आहेत.

या निवडणूका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पुर्वी होणार असल्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांना महत्त्व येणार आहे. तालुक्यातील काकडा, असदपूर, सावळीदातुरा, भिलोना, तुळजापूर जहांगीर, चमक खुर्द, चमक बु., बेलखेडा, वाघडोह, कासमपूर, रामापूर बु., उपातखेडा, जवळापूर, येलकीपुर्णा, हिवरापुर्णा, जवर्डी, वासनी बु., रामापूर बेलज, वासनी खुर्द, सावळी बु., शहापूर, बेनोडा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान नामनिर्देशनपत्र स्वीकारल्या जाणार असून 5 डिसेंबर रोजी प्राप्त नामनिर्देशनपत्राची छाननी, तर 7 डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेतल्यानंतर त्याच वेळी निवडणूक चिन्ह वितरीत केल्या जाणार आहे. 18 डिसेंबरला मतदान, तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

सरपंच पदाचे आरक्षण

ग्रा. पं. आरक्षण

काकडा ओबीसी महिला

असदपूर ओबीसी

सावळीदातुरा सर्वसाधारण महिला

भिलोना अनुसुचित जमाती

तुळजापूर जहॉ. सर्वसाधारण

चमक खुर्द अनुसूचित जाती

चमक बु. अनुसूचित जमाती

बेलखेडा ओबीसी महिला

वाघडोह सर्वसाधारण महिला

कासमपूर ओबीसी

रामापूर बु. सर्वसाधारण महिला

उपातखेडा अनुसूचित जाती

जवळापूर अनुसूचित जाती

येलकीपूर्णा ओबीसी महिला

हिवरापुर्णा ओबीसी

जवर्डी ओबीसी महिला

वासनी बु. अनुसूचित जाती

रामापूर बेलज सर्वसाधारण महिला

वासनी खुर्द ओबीसी महिला

सावळी बु. ओबीसी महिला

शहापूर सर्वसाधारण

असा आहे निवडणूक कार्यक्रम

अचलपूर तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान नामनिर्देशनपत्र स्वीकारल्या जाणार असून 5 डिसेंबर रोजी प्राप्त नामनिर्देशनपत्राची छाननी, तर 7 डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेतल्यानंतर त्याच वेळी निवडणूक चिन्ह वितरीत केल्या जाणार आहे. 18 डिसेंबरला मतदान, तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

बातम्या आणखी आहेत...