आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखली वैद्य ग्रामपंचायत बिनविरोध:17 पैकी 16 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान; 128 सदस्यासाठी 243 उमेदवार रिंगणात

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात 16 ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीसाठी सध्या 58, तर 128 ग्रामपंचायत सदस्यासाठी 243 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी चिखली वैद्य येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने आता केवळ 17 पैकी 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे मतदान येत्या 18 डिसेंबर रोजी होणार आहे.

आता होणाऱ्या ग्रामपंचायतीचे निवडणुकीसमोर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून याकडे पाहिले जात आहे. या निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.

तालुक्यात 17 ग्रामपंचायतींच्या 17 सरपंच, 135 ग्रामपंचायत सदस्यांकरिता होत असलेल्या निवडणुकीत तालुक्यातील चिखली वैद्य ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने आता तालुक्यातील उर्वरित १६ सरपंच पदाकरिता 58, तर 135 सदस्यांकरिता 243 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

तालुक्यातील पाळा, माऊली चोर, शेलुगुड, भगुरा, कोदोरी, साखरा, वडाळा, खिरसाना, पिंपळगाव बैनाई, पुसणेर, काजना, लोहगाव, येवती, रोहणा, सावनेर, खेड पिंपरी या ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान पार पडणार असून तेथे चांगली चुरस पहायला मिळत आहे. थंडीच्या गारव्यात सुद्धा निवडणुकीचे राजकारण चांगलेच कापताना दिसत आहे. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकींची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. सर्वच पक्षांचे पदाधिकारी आपल्या पक्षाचा सरपंच व्हावा याकरिता प्रयत्न करीत आहे. ही निवडणूक गावपातळीवर अस्तित्वाची लढाई म्हणून लढवली जात आहे.

असे आहेत प्राप्त झालेले अर्ज

ग्रा. पं.चे नाव सरपंच सदस्य

पाळा ३ १३

माऊली चोर ४ ३४

शेलुगूंड ३ १६

भगूरा ३ ०९

साखरा ५ ०८

वडाळा २ १४

खिरसाणा ६ १४

पिंपळगाव बैनाई ४ १५

पुसणेर २ १३

काजना ४ १५

लोहगाव २ १२

येवती ४ १९

रोहणा ५ १३

सावनेर ३ २४

खेड पिंपरी ३ १८

कोदोरी ५ ६

बातम्या आणखी आहेत...