आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतींना नागरिकांनी संमिश्र कौल दिला. भाजप, काँग्रेस, राकाँ, सेना व अपक्ष असे सर्व विचारांचे समर्थन करणारे सरपंच या निवडणुकीत विजयी झाले. काजणा, शेलूगुंड, पाळा, साखरा, लोहगाव, पिंपळगाव बैनाई येथील सरपंचपदी भाजप विजयी झाली असून चिखली वैद्य, कोदोरी, येवती, भगुरा, रोहणा येथे अपक्षांनी बाजी मारली.
खेड पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला असून वडाळा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय झाला आहे. दुसरीकडे सावनेर, माहुली चोर, पुसनेरच्या सरपंच पदावर काँग्रेस विजयी झाली आहे.
असे आहेत निकाल
चिखली वैद्य - दिपाली दांडगे (बिनविरोध), सावनेर - अर्चना ठाकरे ६३६ (विजयी) सरोज तायडे (६०२ मते), माहुली चोर संगिता झंजाड ५७८ (विजयी), ममता चोरे (४०८), कोदोरी - लिना केने २६३ (विजयी), बालिका दांडगे (१४३), लोहगाव - सिमा सानप ७६४ (विजयी), मंदा नागरगोजे (३५९), खिरसाना - विशाल मेश्राम २७१ (विजयी), निवृत्ती जगताप (२२६), शेलुगुंड - कांताबाई सावंत - ५७१ (विजयी), शीला मुंदे ४७३, राजना काजणा - नरेंद्र मुंदे - ६६४
विजयी, बबन बोरकर - ३४१, पुसनेर - मदन काजे ३२१ विजयी, पंकज काजे - २४६, साखरा - आकाश गिलबे ३१८ (विजयी), विनोद भोगरे ३१५, खेड पिंपरी - मंगेश कांबळे ३८३ (विजयी), किसन खंडारे ३४६, रोशनी इंगळे ३४६, रोहना - अमरिश काकडे ५३१ (विजयी), शिल्पा रोहणेकर (३४०), येवती - पुनम वायरे ५७९ (विजयी), माया राठोड (३६५), पाळा - पंकज मेटे २७७ (विजयी), प्रमोद मेटे - २२२, पिंपळगाव बैनाई - अरुणा सवई - २९६ (विजयी), अस्मिता साखरे - १८३, वडाळा - संजय शेटे ५६७ (विजयी), प्रशांत मुरादे ४५७ व भगुरा - विनायक दंदे २१५ (विजयी), सुनील जाधव १५९. यातील दुसरे नाव हे पराभुत झालेल्या उमेदवाराचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.