आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिवसा तालुक्यातील निवडणूक निकाल:12 ग्रामपंचायतींमध्ये कुठे काँग्रेस, कुठे भाजप तर कुठे शिवसेनेचे सरपंच

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व जनतेचे लक्ष लागून असलेल्या माजी पालकमंत्री अ‌ॅड. यशोमती ठाकूर यांच्या तिवसा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींचा निकाल "कही खुशी,कही गम" असा आहे. कुठे गुलालाची उधळण तर कुठे जल्लोषमय आनंद पहायला मिळाला.

आज, मंगळवारी सकाळी १० वाजता तहसील सभागृहात मतमोजणी पार पडली. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतीच्या निकालाची घोषणा झाली. घोषणा होताच विविध गटातील लोकांनी विजयाचा गुलाल उडवून एकच जल्लोष केला. यामध्ये काँग्रेस, भाजप, प्रहार, अपक्ष सरपंच निवडून आले. तिवसा तालुक्यातील कौडण्यपूर, शेंदुर्जना खुर्द, फत्तेपूर, वरुडा, करजगाव, सालोरा, अनकवाडी, पालवाडी, दुर्गवाडा, वनी, डेहनी, निंभोरा-देलवाडी या बारा ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले.

१२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ४२ उमेदवार तर सदस्यांसाठी १७१ उमेदवार निवडणूकीच्या रींगणात उभे होते. काँग्रेस, भाजप, शिवसेना, प्रहार अश्या विविध पक्षानी सरपंच पदासह सदस्यासाठी आपले पॅनल या निवडणुकीत उभे केले होते. हाती आलेल्या निकालात अनेक ठिकाणी काँग्रेसला मोठा धक्का देत भाजपने तालुक्यात कमळ फुलवले तर काही ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले.

तिवसा तहसील सभागृहात ही मतमोजणी तहसीलदार वैभव फरतारे, नायब तहसीलदार अशोक काळीवकर यांच्या मार्गदर्शनात नंदकिशोर मधापुरे, सतीश काकपुरे, संजय मुन्द्रे, अरुण बोरकर यांनी पार पाडली. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात तहसील परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

भातकुली तालुक्यात नऊ महिला सरपंच

भातकुली तालुक्यातील वाकी रायपूर येथे संजीवनी सतिश जंवजाळ, पोहरा पुर्णा येथे गजानन माेतिराम लांजेवार, सोनारखेडा सोनू मुरलीधर सोळंके, कानफाेडी तस्कीनजहा अहमद खान, हरतोटी विजय सहदेव गुडधे, खालखोनी तेजस्वी मनिष भटकर, शिवनी बु. विद्या मंगेश घाटे, कुमागड अंजना रघुनाथ आठवले, परलाम रेखा गंगाधर मालठाणे, पुर्णानगर जोत्स्ना गजेन्दसिंग गहरवाल आणि खोलापूर सरला दादाराव इंगळे आदी सरपंचपदी निवडून आले आहे.

बातम्या आणखी आहेत...