आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी:सरपंच पदासाठी 100; सदस्यांसाठी 434 उमेदवारी अर्ज दाखल

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचलपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीला प्रारंभ झाला आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 23 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 100 नामांकन, तर सदस्यांसाठी 434 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे. प्राप्त नामनिर्देशनपत्राची सोमवारी (दि. 5) छाननी केली जाणार आहे.

तालुक्यातील दोनोडा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 19 नामनिर्देशनपत्र, तर सर्वात कमी जवर्डी, जवळापूर, बळेगाव येथे प्रत्येकी दोन-दोन नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. काकडा येथील सरपंच पदासाठी 6, तर सदस्य पदासाठी 45, बळेगाव येथे सरपंचासाठी 2, सदस्य 17, रामापूर बेलज ग्रामपंचायतीच्या सरपंचसाठी 3, तर सदस्याकरिता 13, हिवरापूर्णा येथीलच्या सरपंच पदाकिरता 5, तर सदस्यांसाठी 10, वासनी बु. येथे सरपंच 6, सदस्यांसाठी 15, वासनी खुर्द येथे सरपंच 3, सदस्यांसाठी 16, दोनोडा येथे सरपंच पदासाठी 10, सदस्यांसाठी 9, जवळापूर येथे सरपंचासाठी 2, सदस्यांसाठी 17, रामापुर बु. येथे सरपंच पदासाठी 3 सदस्यांसाठी 18, कासमपूर सरपंचाकरिता 6, सदस्यांसाठी 18, उपातखेडा येथे सरपंचासाठी 6, सदस्यांसाठी 24, वाघडोह येथे सरपंच 5, सदस्यांसाठी 25, भिलोना येथे सरपंच 4, सदस्यांसाठी 28, चमक बु. ग्रा. पं.च्या सरपंचासाठी 3, सदस्यांसाठी 16, चमक खुर्द येथे सरपंच 3, सदस्यांसाठी 17, सावळी दातुरा येथे सरपंच 4, सदस्यांसाठी 22, जवर्डी येथे सरपंच 2, सदस्यांसाठी 14, येलकीपुर्णा येथे सरपंच 3, सदस्यांसाठी 12, सावळी बु. येथे सरपंच 3, सदस्यांसाठी 11, तुळजापूर जहॉं. येथे सरपंच 9, सदस्यांसाठी 23, असदपूर येथे सरपंच 4, सदस्यांसाठी 34, शहापूर येथे सरपंच 4, सदस्यांसाठी 15 असे नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार 5 डिसेंबर रोजी प्राप्त नामनिर्देशनपत्राची छाननी, तर 7 डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेतल्यानंतर त्याच वेळी निवडणूक चिन्ह वितरीत केल्या जाणार आहे. 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूकीतील उमेदवारांची अंतीम यादी 7 डिसेंबर नंतरच निश्चित होईल.

बातम्या आणखी आहेत...