आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल जीवन मिशन:बेलोरा येथे ‘हर घर जल मिशन’साठी ग्रामसभा ; हर घर जल घोषित

दर्यापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बेलोरा येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संयुक्त सहकार्याने जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल घोषित करण्यासाठी सरपंच अनिल भारसाकळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली.ग्रामसभेला स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक राहुल यावले, संस्था प्रतिनिधी सोहेल काजे, स्थापत्य अभियंता पवन भोंगळे, सतीश रामकर व प्रभाग समन्वयक विठ्ठल सपकाळ उपस्थित होते. या वेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ग्रामसभेच्या माध्यमातून पाणीटंचाईचा ठराव प्राधिकरणाला द्यावा असे ठरले. ग्रामसभा सुरू होण्यापुर्वी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी जल जीवन मिशन अंतर्गत रॅली काढली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक गणेश रामेकर, तर आभार प्रदर्शन ग्रामसचिव संजय धोटे यांनी केले. या प्रसंगी गावातील तसेच बचत गटातील महिला व नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...