आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन‎:‘स्त्रियांचे आधुनिक काळातील‎ योगदान व प्रगती’ वर मार्गदर्शन‎

कुऱ्हा‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशोक नगर येथील अशोक शिक्षण‎ संस्थाद्वारा संचालित कुऱ्हा‎ हायस्कूल व कनिष्ठ‎ महाविद्यालयात नुकतेच सावित्रीबाई‎ फुले यांच्या स्मृतिदिवसानिमित्त‎ स्त्रियांचे आधुनिक काळातील‎ योगदान व स्त्रियांनी केलेली प्रगती‎ या विषयावर मार्गदर्शनपर‎ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात‎ आले होते.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ प्राचार्य एस. पी. सामुद्रे होत्या. या‎ प्रसंगी त्यांनी विषयाच्या अनुषंगाने‎ मार्गदर्शन केले. ईश्वरी दारोकार हिने‎ पोवाड्याचे सादरीकरण करीत‎ उपस्थितांचे लक्ष वेधले. या प्रसंगी‎ प्रा. एस. पी. ढोले, प्रा. एम. एस.‎ शिरभाते, ए. बी. चांबटकर, के. एन.‎ ढगे, एस. व्ही. चौधरी, जे. पी.‎ निमकर यांचा महाविद्यालयाद्वारे‎ स्वागत व सत्कार करण्यात आला.‎

या वेळी प्रमुख वक्ता म्हणून‎ लाभलेले एस. बी. जाधव यांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सावित्रीबाई फुले यांच्या जीवन‎ कार्यावर प्रकाश टाकला, तर पी. ए.‎ पडोळे यांनी आधुनिक काळातील‎ स्त्रियांच्या विविध भूमिका व ते‎ करत असलेले कार्य व प्रत्येक‎ क्षेत्रातील स्त्रियांचा वाटा याबद्दल‎ आपले मनोगत व्यक्त केले.‎ कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. एस.‎ आर. जिरापुरे, सूत्रसंचालन एस.‎ एस. चव्हाण, तर आभार प्रदर्शन प्रा.‎ एस. पी. रवाळे यांनी केले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎

कार्यक्रमाचे आयोजन भूगोल‎ विभाग व इतिहास विभागाद्वारे‎ करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या‎ यशस्वीतेसाठी ए. बी. चांबटकर,‎ प्रा. एम. एच. वाळके, प्रा. पी. एम.‎ श्रीखंडे, प्रा. एस. पी. रवाळे, प्रा.‎ एस. आर. जिरापुरे, प्रा. एस. पी.‎ ढोले, एस. आर. इसळ, एस. एस.‎ चव्हाण, एस. बी. जाधव, पी. एम.‎ राऊत, ए. के. काळे, आर. ए.‎ गुल्हाने आदींनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...