आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:दर्यापुरात बी-बियाणे विक्रेत्यांना मार्गदर्शन; बी-बियाणे,रासायनिक खते, पुरवठा व विक्रीबाबत मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या

दर्यापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने खरीपपूर्वं हंगाम २०२२-२३ करीता नियोजन प्रशिक्षण सभा पंचायत समिती कार्यालयात तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार, तालुका कृषी निविष्ठा संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण काळमेघ, नानाभाऊ कळमकर यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली.

खरीपपूर्व नियोजन व प्रशिक्षणामध्ये कृषी नि विष्ठा विक्रेत्यांना बी-बियाणे,रासायनिक खते, पुरवठा व विक्रीबाबत मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या. कृषी सेवा केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांना नियमानुसार विक्री करावी अन्यथा नियमबाह्य विक्री व साठवणूक केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार यांनी दिला. खरीप हंगामा करिता तालुक्यात डीएपी, युरिया मिश्र खतांचा पाहिजे त्याप्रमाणात पुरवठा होईल अशी ग्वाही दिली. तसेच कृषी केंद्राच्या समस्यांवरही अडगोकार यांनी प्रकाश टाकला. सूत्रसंचालन पं. स. कृषी अधिकारी सुरेश रामागडे यांनी केले. नियोजन सभेला शहर व तालुक्यातील कृषी सेवा केंद्राचे संचालक उपस्थित होते.

डीएपी खताला पर्याय : डीएपी खताला पर्याय म्हणून २ बॅग सुपर फॉस्पेट व १ बॅग युरियाचे मिश्रण केल्यास डीएपी खताप्रमाणेच शेतातील पिकासाठी उपयुक्त होईल. या साठी सर्वं कृषी केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांना माहिती देऊन प्रवृत्त करावे, असा सूचना अधिकाऱ्यांनी कृषी विक्रेत्यांना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...