आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटख्यासह 16 लाख 47 हजारांचा ऐवज जप्त‎:अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या‎ गुटखा कारखान्यावर धाड‎

अमरावती‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव रहाटगाव मार्गावरील एका‎ अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या अवैध‎ गुटखा निर्मिती कारखान्यावर धाड‎ टाकून गुटखा बनवण्यासाठी वापरात‎ येणारा कच्चा माल, मशिनरी व इतर‎ साहित्य जप्त करण्यात आले. ही‎ कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने केली‎ आहे. या कारवाई दरम्यान अवैध‎ गुटखा तसेच एक कार असा एकूण १६‎ लाख ४७ हजार रुपये किमतीचा‎ मुद्देमाल जप्त केला आहे. याचवेळी‎ दोघांना ताब्यात घेण्यात आले.‎

प्रकाश बाबुरावजी बावनकुळे‎ (३८) आणि अंकुश सतीश नावंदर‎ (२९, दोघेही रा. शिराळा) या दोघांना‎ ताब्यात घेण्यात आले. शेगाव रहाटगाव‎ मार्गावरील एका बारमागे असलेल्या‎ अपार्टमेंटमध्ये काहींनी गुटखा‎ निर्मितीचा गोरखधंदा सुरू केल्याची‎ माहिती शहर गुन्हे शाखेला मिळाली‎ होती. या माहितीवरून गुन्हे शाखेचे‎ पोलिस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे‎ यांनी पथकासह मंगळवारी दुपारी‎ अपार्टमेंटमध्ये धाड टाकली. त्यावेळी‎ तेथे पानमसाला, गुटख्याचे उत्पादन‎ सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे‎ पोलिसांनी तेथे कार्यरत असलेल्या‎ प्रकाश बावनकुळे व अंकुश नावंदर‎ यांना ताब्यात घेत खुला पान मसाला,‎ गुटखा, पॅकिंग रोल, गुटखा तयार‎ करण्याच्या पाऊचिंग मशीन, सिलिंग‎ मशीन, पोते शिलाई मशीन, व्होल्टेज‎ स्टॅबलायझर मशीन, दोन मोबाइल तथा‎ सहा लाख रुपये किमतीचे वाहन असा‎ एकूण १६ लाख ४७ हजार ४१८‎ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.‎

बातम्या आणखी आहेत...