आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी पाऊस:अर्धा तास वादळी पावसाचा तडाखा; झाडे पडली, शहरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा झाला खंडित

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाजार समितीतील धान्य भिजले; जाहिरातींचे बॅनर्स फाटले

शहराला सायंकाळी ३.३० च्या सुमारास वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. ३० ते ४० कि.मी.प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे काही भागातील विद्युत पुरवठा ठप्प झाला. काही ठिकाणी विद्युत खांब वाकले, जाहिरातींचे मोठे बॅनर्स फाटले, १५ ठिकाणी झाडे कोसळली, एक झाड ऑटोवर कोसळले त्यात ऑटोचे नुकसान झाले. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती येथे विक्रीसाठी आणलेले सोयाबीन, तूर पाण्यात ओले झाल्यामुळे बळीराजाचे नुकसान झाले. मात्र शहरात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मनपा अग्निशमन विभागाद्वारे देण्यात आली.

वादळी पावसाने अमरावती येथील एपीएमसीत शेकडो क्विंटल सोयाबीन, तूर वाया जाण्याच्या मार्गावर आहे. यावेळी शेतकऱ्यांची धावपळ, तारांबळ उडाली होती.

बातम्या आणखी आहेत...