आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेक्टर कचेरी भागात ध्वज विक्री केंद्र सुरू:स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवणार

अमरावती5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ‘झेंडा विक्री केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते बुधवारी झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व महिला बचत गटाच्या महिला यावेळी उपस्थित होत्या.

‘माविम’च्या माध्यमातून झेंडा विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. बचत गटातील महिला भगिनींनी माविमच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा फडकावा, यासाठी अनेक ठिकाणी झेंडे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तशी केंद्रेही ठिक-ठिकाणी सुरु होत आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रत्येक घरावर तिरंगा लावून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

उपक्रमाबाबत गावोगाव जनजागृतीही होत आहे. विविध कार्यालये, संस्था यांचा सहभाग मिळत आहे. झेंड्याची सर्वत्र उपलब्धता असण्यासाठी तालुकास्थळी केंद्रे सुरू होत आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी बिजवल यांनी सांगितले.जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते झेंडा विक्री केंद्राचा शुभारंभ झाला.

बातम्या आणखी आहेत...