आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती जिल्ह्यातील अंबाडा गावात एका 22 वर्षीय युवकाने तालुक्यातीलच 19 वर्षीय युवतीसोबत 28 एप्रिलला प्रेमविवाह केला. मात्र मुलींच्या घरच्यांना हा विवाह मान्य नसल्याने 4 मे रोजी मुलीच्या माहेरच्या नातेवाईकांनी मुलीला पतीच्या घरातून अक्षरश: फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी नवविवाहित पतीने माेर्शी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
22 वर्षीय युवक व 19 वर्षीय युवतीने लग्न करण्याचा निर्णय घेवून 28 एप्रिलला आर्य समाज मंदीर, अमरावती येथे विवाह केला त्यानंतर त्यांनी विवाह प्रमाणपत्रही घेतले. पण मुलीच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते. लग्नामुळे मुलीचे कुटुंब प्रचंड संतापले होते.
मुलीला फरफटत माहेरी आणले
संतापाच्या भरात 4 मे रोजी मुलीचे आई-वडिल आणि नातेवाईक मुलाच्या घरी पोहचले. मुलाच्या आई-वडिलांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण संतापलेल्या पालकांनी मुलीला मारहाण करायला सुरुवात केली. यावरच ते थांबले नाहीत मुलगी विरोध करत असतानाही तिला अक्षरश: फरफटत घरी घेऊन आले.
व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल
त्या युवकाने तत्काळ या प्रकरणाची माहीती मोर्शी पोलिसांना दिली. मोर्शी पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला आहे. मात्र शनिवारी रात्री नऊ वाजेपर्यंत मोर्शी पोलिस मुलीपर्यंत पोहचले नव्हते. दरम्यान नेमका प्रकार मुलीच्या जवाबानंतर समोर येईल, त्यादृष्टीने पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मुलीला काही व्यक्ती जबरदस्तीने फरफटत नेत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणामुळे जोरदार खळबळ उडाली आहे.
मुलीच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना
प्रेमविवाह केेल्यानंतर मुलीला तिच्या माहेरच्या मंडळींनी जबदस्तीने घरातून नेले आहे, नेमके कुठे नेले याबाबत आपल्याला माहिती नाही, अशी तक्रार युवकाने दिली आहे. त्या आधारे चौकशी सुरू आहे. आम्ही मुलीचा शोध सुरू केला असून मुलीचा जवाब घेण्यात येईल. मुलीच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. मुलीच्या जबाबानंतर पुढील कारवाई केली जाईल. अशी माहिती पोलिस मोर्शी पोलिसांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.