आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Harshvardhan Deshmukh As Chairman Of 'Shivaji', Pundkar, Pusdekar, Metkar As Vice chairman, Eight Seats For Pragati Panel, Only One Seat For 'Vikas'

निवड:‘शिवाजी’च्या अध्यक्षपदी हर्षवर्धन देशमुख, तर उपाध्यक्षपदी पुंडकर, पुसदेकर, मेतकर, प्रगती पॅनलला आठ जागा

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था म्हणून लौकिक असलेल्या येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन देशमुख यांची फेरनिवड झाली. त्यांना ३८९ मते मिळाली. तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी नरेशचंद्र ठाकरे यांना २७२ मते मिळाली.

रविवारी दुपारी पार पडलेल्या या निवडणुकीत ७७४ पैकी ६७२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, नऊ सदस्यीय कार्यकारिणीमध्ये हर्षवर्धन देशमुख यांच्या प्रगती पॅनलने आठ जागा जिंकल्या असून केवळ एक जागा प्रतिस्पर्धी विकास पॅनलच्या वाट्याला गेली आहे. श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी साडेसात वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. सर्वप्रथम सदस्य नंतर उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि अध्यक्ष असा मतमोजणीला क्रम होता. दरम्यान, कोषाध्यक्षपदी दिलीप इंगोले तर उपाध्यक्षपदी अॅड. गजानन पुंडकर, अॅड. भय्यासाहेब पुसदेकर पाटील व केशव मेतकर विजयी झाले.

कार्यकारिणीची चारही सदस्यपद हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातील प्रगती पॅनलने जिंकली आहेत. निकालानुसार उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक ३९२ मते अॅड. गजानन पुंडकर तर दुसऱ्या क्रमांकाची ३१८ मते अॅड. जयवंत ऊर्फ भैय्यासाहेब पाटील पुसदेकर यांना मिळाली. २९५ मते घेऊन विकास पॅनलचे केशव मेतकर उपाध्यक्षाच्या तिसऱ्या पदावर विजयी झाले.

कार्यकारिणीच्या चार सदस्यांसाठी एकूण १० जण मैदानात होते. त्यापैकी हेमंत काळमेघ (४९०), केशवराव गावंडे (३८७), सुरेश खोटरे (३३१) व सुभाष बनसोड विजयी झाले. पराभूत सहा उमेदवारांमध्ये दिनकर गायगोले, सुरेंद्र आंडे, रमेश हिंगणकर, आनंद देशमुख, प्राध्यापक प्रमोद झाडे व नरहरपंत होले यांचा समावेश आहे. ‘शिवाजी’च्या कार्यकारी परिषदेची निवडणूक रविवारी सकाळी ८ ते ५ या वेळात पार पडली. ७७४ पैकी ६७२ (८६.८२ टक्के) जणांनी मतदान केले. कार्यकारिणीची चारही सदस्यपदे हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातील प्रगती पॅनलने जिंकली आहेत. निकालानुसार उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक ३९२ मते गजानन पुंडकर तर दुसऱ्या क्रमांकाची ३१८ मते अॅड जयवंत ऊर्फ भैय्यासाहेब पाटील पुसदेकर यांना मिळाली. २९५ मते घेऊन विकास पॅनलचे केशव मेतकर उपाध्यक्षाच्या तिसऱ्या पदावर विजयी झाले.

कार्यकारिणीच्या चार सदस्यांसाठी एकूण १० जण मैदानात होते. त्यापैकी हेमंत काळमेघ (४९०), केशवराव गावंडे (३८७), सुरेश खोटरे (३३१) व सुभाष बनसोड विजयी झाले. पराभूत सहा उमेदवारांमध्ये दिनकर गायगोले, सुरेंद्र आडे, रमेश हिंगणकर, आनंद देशमुख, प्राध्यापक प्रमोद झाडे व नरहरपंत होले यांचा समावेश आहे.

‘शिवाजी’च्या कार्यकारी परिषदेची निवडणूक रविवारी सकाळी ८ ते ५ या वेळात पार पडली. ७७४ पैकी ६७२ (८६.८२ टक्के) जणांनी मतदान केले.

बातम्या आणखी आहेत...