आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंशय घेऊन वारंवार मुलाला त्रास देत असल्याचा आरोप करुन एका ५५ वर्षीय वडीलांचा २२ वर्षीय मुलाने दोरीने गळा आवळून खून केला. ही घटना खोलापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दारापूर येथे शुक्रवारी (दि. १७) रात्री समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पित्याने आत्महत्या केली, असा बनाव त्याने रचला होता.
संजय वासुदेवराव ईसळ (५५, रा. दारापूर) असे मृताचे तर गौरव संजयराव ईसळ (२२, रा. दारापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या मारेकरी मुलाचे नाव आहे. संजय ईसळ यांचा मृतदेह १५ मार्चला सकाळी घरातच आढळला होता. त्यावेळी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता संजय ईसळ यांच्या अंगावर विषारी द्रव्य सांडलेले होते तसेच विषारी द्रव्याचा दुर्गंधसुद्धा त्या ठिकाणी येत होता. त्यामुळे त्यांनी विषारी द्रव्य सेवन करुन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते.
दरम्यान, मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांसोबत चर्चा केली. त्यावेळी डॉक्टरांनी हा मृत्यू विषबाधेने नसून, गळा आवळल्याने झाला असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच पोलिसांनासुद्धा पंचनामादरम्यान हा खून असल्याचा अंदाज आला होता. त्यामुळेच खोलापूरचे ठाणेदार संघरक्षक भगत यांनी शुक्रवारी रात्री संजय यांचा मुलगा गौरव याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, वडील हे वारंवार संशय घेत होते. त्यामधून अनेकदा वाद झाले होते. घटनेच्या दिवशी म्हणजेच १४ मार्चला रात्रीसुद्धा वाद झाला. त्या वादानंतर रागातून दोरीने गळा आवळून त्यांचा खून केला व हा मृत्यू आत्महत्या वाटावी, म्हणून अंगावर विषारी द्रव्य टाकले. हा प्रकार समोर येताच गौरवला तत्काळ अटक केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.