आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसचा केंद्रातील वनवास लवकरच संपुष्टात येणार असल्याचा ठाम विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षा नाना पटोले यांनी शुक्रवारी व्यक्त केला. 'प्रभु रामचंद्रांनी वनवासात असताना तळागाळातील जनतेचा पाठिंबा मिळविला. काँग्रेसही याच मार्गाने वाटचाल करत आहे. काँग्रेसवर हिंदूविरोधी असल्याचे आरोप होतात. पण, त्यात कोणतेही तथ्य नाही. धनगरांसारखे अनेक समाज आमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असल्यामुळे काँग्रेसचा वनवास लवकरच संपेल,' असे ते म्हणाले. ते आज अमरावतीत आयोजित विभागीय धनगर परिषदेत बोलत होते.
पटोलेंचे केंद्रावर टीकास्त्र
सर्वसामान्यांची फसवणूक करून काही मोजक्या उद्योजकांचे केंद्र सरकार खिसे भरीत आहे. याच्या निषेधार्थ मी खासदारकीचा राजीनामा दिला होता. या मुद्यासह महागाई, बेरोजगारीकडे लक्ष जाऊ नये म्हणून धार्मिक मुद्दे उकरून काढले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
केंद्र सरकारचे दुटप्पी धोरण असून एकिकडे देशवासीयांची कोरोना लसीची गरज पूर्ण केली जात नाही तर दुसरीकडे भारतविरोधी कारवाया करणारे शत्रूराष्ट्र पाकिस्तानला मोफत लस वाटली जात आहे. त्याचवेळी देशातील हिंदू-मुस्लिमांना एकमेकांविरुद्ध भडकविले जात असल्याची टिकाही पटोले यांनी केली.
..तर धनगरांना आपोआपच आरक्षण
राज्यात जातनिहाय जनगणना झाली तर धनगरांना कोणापुढेही हात परवावे लागणार नाहीत. संविधानानुसार त्यांना आपोआपच आरक्षण मिळेल, असे म्हटल्यानंतर आम्ही धनगरांना आरक्षण मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असेही पटोले म्हणाले.
वाझे प्रकरणीात फडणवीसांकडून दिशाभूल
बडतर्फ पोलिस अधिकारी सचिव वाझे प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची दिशाभूल केली. त्याचवेळी मी विधानसभा अध्यक्षांना हे दिशाभूल करीत असल्याचे म्हटले होते. आता झालेही तसेच तेच सचिन वाझे आता माफीचे साक्षीदार झाले आहेत. यावरून काय समजायचे ते समजते, असा टोमणाही त्यांनी हाणला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.