आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटना:भरधाव जाणाऱ्या ट्रक आणि काळी‎ पिवळीची समोरासमोर धडक‎ ; काळी पिवळीचा चालक जखमी‎

मलकापूर‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या ट्रक व काळी‎ पिवळी वाहनाची समोरासमोर धडक‎ झाली. ही घटना तालुक्यातील दाताळा‎ येथील गणपती जीन जवळ रात्री‎ पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली.‎ हा अपघात एवढा भीषण होता की, या‎ अपघातात काळी पिवळीचा समोरील‎ भाग ट्रकच्या खाली घुसलेला होता. या‎ अपघातात शेलापूर येथील काळी‎ पिवळीचा चालक सचिन गायकवाड‎ वय २२ हा गंभीर जखमी झाला आहे.‎

बुलडाणा येथून आर. जे.१७/ जि ए/‎ ६१३२ या क्रमांकाचा ट्रक मलकापूर‎ कडे येत होता. तर एम.एच. २८ /एच‎ २९७३ या क्रमांकाची काळी पिवळी‎ मलकापूर कडून मोताळ्याकडे जात‎ होती. मलकापूर मोताळा मार्गावरील‎ गणपती जीन जवळ येताच दोन्ही‎ वाहनाची समोरासमोर धडक झाली.‎ या अपघातात काळी पिवळीचा‎ समोरील भाग अक्षरशा चकनाचुर‎ झाला असून चालक गंभीर जखमी‎ झाला आहे. अपघाताची माहिती‎ मिळताच परिसरातील नागरिक,‎ पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यानी‎ घटनास्थळी धाव घेत मदत केली.‎

तसेच बीट जमादार सचिन दासार,‎ पोहेकॉ संदीप राखुंडे सुभाष सोळंके,‎ गणेश सूर्यवंशी, सुभाष सरदार या‎ पोलिस कर्मचाऱ्यांनी अपघातात गंभीर‎ जखमी झालेल्या चालकास तातडीने‎ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य‎ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.‎ परंतु चालकाची प्रकृती चिंताजनक‎ असल्यामुळे त्याला पुढील‎ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे‎ हलवण्यात आले आहे. अपघात‎ घडताच ट्रक चालकाने पलायन केले‎ होते. वृत्त लिहिपर्यत ग्रामीण पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.‎

बातम्या आणखी आहेत...