आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत हे २ व ३ डिसेंबरला मेळघाट दौऱ्यावर असून, ते धारणी व चिखलदरा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची पाहणी करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रानुसार, शुक्रवार, दि.२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता नागपूर विमानतळ येथे डॉ. सावंत आगमन होईल. त्यानंतर मोटारीने ते अचलपूरकडे प्रयाण करतील. सकाळी ११.३० वाजता शासकीय विश्रामगृह, अचलपूर येथे आगमन झाल्यावर दुपारी १२ वाजता तेथील उपजिल्हा रुग्णालयात पोहोचतील. दुपारी १ वाजता बिहालीकडे प्रयाण करुन तेथील उपकेंद्राची पाहणी करतील. पुढे सलोना प्राथमिक आरोग्य केंद्र, आमझरीचे उपकेंद्र येथे भेटी देऊन दुपारी ४.३० वाजता चिखलदरा येथे पोहोचतील. तेथील सरकारी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर तेथेच मुक्काम करतील.
शनिवार, ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता चिखलदराहून सेमाडोहकडे प्रयाण करतील. तेथील आरोग्य केंद्राची पाहणी केल्यानंतर हरिसालला भेट देऊन सकाळी ११ वाजता धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात पोहोचतील. येथील पाहणीनंतर ११.३० वाजता अचलपूरकडे प्रयाण करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.